मोठेवाडीत मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषण




मोठेवाडीत मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषण
माजलगाव ( प्रतिनिधी ) तालुक्यातील मोठेवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून मोठेवाडी येथील गावकऱ्यांच्या वतीने मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषणाला दि.१० सप्टेंबर रविवार पासून सुरुवात करण्यात आली आहे.मराठा समाजाला हक्काचे आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. या अगोदर अनेक वेळा आरक्षणासाठी आंदोलने करण्यात आली. परंतु, शासनाने केवळ आश्वासन दिले.
ते अद्यापही पूर्ण केले नाही. त्यामुळे मोठेवाडी येथील ग्रामस्थांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहणार असल्याचा पवित्रा घेण्यात आला आहे. या आंदोलनात ग्रामस्थांनी सहभाग घेतला. याप्रसंगी मोठेवाडी येथील सकल मराठा समाजाची उपस्थिती होती.ं
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा