शिक्षकांची अशैक्षणिक कामे रद्द करा तहसीलवर शिक्षकांचा भव्य मूक मोर्च




शिक्षकांची अशैक्षणिक कामे रद्द करा
तहसीलवर शिक्षकांचा भव्य मूक मोर्च
माजलगाव  (प्रतिनिधी) शिक्षकांना सरकारी शाळेत ‘शिक्षण कमी, उपक्रम फार’ ;
जिल्हा परिषद शिक्षक अशैक्षणिक कामाने बेजार
आम्हाला शिकवू द्या म्हणत शिक्षकांचा आक्रोश
मूक मोर्चा माजलगावात संपन्न झाला.
       विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांची असते. मात्र मागील काही दिवसांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे. त्यातच जिल्हा परिषद शिक्षकांना विविध सामाजिक जबाबदाऱ्यांसह अशैक्षणिक कामे करावी लागतात. त्यात भर म्हणून गटशिक्षणाधिकरी कार्यालयांपासून मंत्रालयातील शालेय शिक्षण विभागापर्यंत रोज एक उपक्रम दिला जात आहे. याच्या विरोधात अशैक्षणिक कामे बंद करा, आम्हाला शिकवू द्या!
 असा
आर्त टाहो फोडत माजलगाव तालुक्यातील शिक्षक समन्वय समिती ने शासनाच्या विरोधात भव्य मूक मोर्चा काढला. या मोर्चात निरक्षरांचे सर्वेक्षण व मतदार याद्या तयार करण्याचे BLO चे काम याविषयी प्रचंड रोष दिसून आला.
या लादलेल्या कामाच्या परिणामी मुलांच्या गुणवत्ता बिघडली आहे. त्यातून काही शिक्षक आपल्या परीने त्यांना शिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र त्यांना रोज एका उपक्रमाचा सामना करावा लागत आहे. शिक्षकांना विविध अशैक्षणिक कामांत गुंतवून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष शिकविण्यापेक्षा इतर कामांतच अधिक असते. अशा वेळी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा करणे चुकीचे ठरत आहे.
शिक्षकांना सातत्याने इतर कामातच गुंतवत विविध प्रकारची सर्वेक्षण,
शालेय पोषण आहार वाटपाची कामे,मतदार याद्या तयार करणे, जनगणना, पटनोंदणी, विविध साथरोग निर्मूलनासाठी सर्वेक्षण, वृक्षारोपण, शाळेची रंगरंगोटी, विद्यार्थ्यांचे बँक खाते, आधार कार्ड काढून देणे, पालकांची सभा, शाळा व्यवस्थापन समिती सभा, शाळेची ऑनलाईन माहिती भरणे, यू डायसवर माहिती भरणे, शैक्षणिक अहवाल तयार करणे, शिष्यवृत्तीबाबत
माहिती भरणे, शिक्षण विभागाने मागितलेली माहिती पुरविणे, पोषण आहारच्या नोंदी ठेवणे, धान्यसाठा नोंदविणे, धान्य, साहित्याची मागणी, शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे, विद्यार्थ्यांना धान्य वितरण करणे, प्रत्येक राष्ट्रीय कामात मदत करणे, अशी कामे करावी लागतात.
याचबरोबर स्वातंत्र्याचा अमृतमोहोत्सव, स्वच्छता पंधरवडा, सद्भावना ऐक्य पंधरवडा, शिक्षण परिषद, गुणवत्ता कार्यशाळा, पंचायत समिती स्तरावर मुख्यद्यापक बैठक, लेखापरिक्षण, सेल्फी उपक्रम, वर्गात शिक्षकांचा फोटो असे उपक्रम देखील राबवावी लागतात.
आता मात्र शिक्षकांच्या संयमाचा बांध फुटला असून ते रस्त्यावर उतरले आहेत. या सर्व अशैक्षणिक कामांच्या निषेधार्थ माजलगाव तालुक्यातील शिक्षकांनी एकत्र येत मूक मोर्चा काढला. या मोर्चात तालुक्यातील सर्व शिक्षक सामील झाले होते, विशेषता महिला शिक्षक मोठ्या संख्येने होते. यावेळी अनेक पालकांनी व शालेय व्यवस्थापन समित्यांनी या मोर्चाला पाठींबा दिला. हा मोर्चा गटशिक्षणाधिकारी कार्यालयापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसील कार्यालय माजलगाव पर्यंत जोशामध्ये पार पडला. त्या ठिकाणी तहसीलदार मॅडम यांनी निवेदन स्वीकारून त्यांनी  वरिष्ठ कार्यालयांना आपल्या मागण्या कळवते अशी ग्वाही दिली.
   यापुढेही अशैक्षणिक कामे बंद न झाल्यास हा लढा आणखीन तीव्र करण्याचा इशारा शिक्षक समन्वय समिती च्या वतीने देण्यात आला.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा