मराठा समाजाच्या वतीने पवारवाडी येथे एक दिवसीय उपोषण




मराठा समाजाच्या वतीने पवारवाडी येथे एक दिवसीय उपोषण
माजलगाव ( प्रतिनिधी ) तालुक्यातील पवारवाडी येथे अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने  सकाळी १०:०० ते सायं ५:००  वाजेपर्यंत एक दिवसीय लक्षणीक उपोषण दि.१० सप्टेंबर रविवार रोजी करण्यात आले.
 मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे लोण आता गावागावात पाहायला मिळत आहे. मराठा समाजाची शैक्षणिक व आर्थिक स्थिती खालवलेली असुन समाजास शैक्षणिक व नोकरीत ओबीसी आरक्षणाची नितांत गरज आहे.हे वेगवेगळ्या अहवालातुन सिद्ध झाले आहे.सरसगट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे असी मागणी पवारवाडी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने या आंदोलनात करण्यात आली. या एकदिवसीय लक्षणीय उपोषणात गावातील तरुण, वृद्ध आणि महिलाही सहभागी झाल्या होत्या.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा