निजामाच्या तावडीतून मुक्त होऊन 75 वर्ष उलटली तरी मराठवाडा क्रीडा क्षेत्रात अद्याप माघेच का आहे?




निजामाच्या तावडीतून मुक्त होऊन 75 वर्ष उलटली तरी मराठवाडा क्रीडा क्षेत्रात अद्याप माघेच का आहे ?

बीड !

15 सप्टेंबर : आपल्या देशाचा अमृत महोत्सव हा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्याचबरोबर निजामाच्या तावडीतून मराठवाड्याला मुक्ती मिळाल्याच्या घटनेला आता 75 वर्ष होत आहेत. यंदाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रातल्या घडामोडींचा आढावा घेण्यात येतोय. त्यावेळी मराठवाड्यातील जिल्हे हे क्रीडा क्षेत्रात मागं असल्याचं समोर आलंय. मराठवाडा क्रीडा क्षेत्रात मागे का आहे? बीडमधील खेळाडूंना कोणत्या अडचणी सहन कराव्या लागतात?

बीड जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता आहे त्यातच त्यांच्या अंगी जिद्द ही आहे. पण, जिल्ह्यात पुरेशा सोयी-सुविधा नसल्याचा फटका खेळाडूंना बसतोय. सरकारकडून खेळाडूंसाठी जाहीर केलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचं चित्र आहे.
मराठवाड्यात वेगवेगळ्या योजनेवर करोडो रुपये दरवर्षी खर्च होतात. जिल्हा आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडांगण सुविधा देण्याची नितांत गरज आहे. ही गरज अद्याप पूर्ण झालेली नाही. जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुल उभारण्याचा विषय सरकारी दप्तरातच अडकलेले आहेत. असं मत तायकांदो संघटनेच्या राज्याध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे यांनी व्यक्त केलंय.

सीमा खचली नाही, नवऱ्यावरील संकट स्वत:च्या खांद्यावर घेतलं; सुनबाईंचं गावात होतंय कौतुक!
काही ठिकाणी क्रीडा संकुलाच्या इमारती उभ्या झाल्या आहेत. त्यामधील काही इमारतीमध्ये साहित्य आहे तर प्रशिक्षक नाहीत. तर काही ठिकाणी प्रशिक्षक आहेत तर साहित्य नाही. मी मागच्या पाच वर्षांपासून कुस्तीचा सराव करतोय. कुस्तीच्या मॅटवर रात्री सराव करायचा असेल तर लाईटची सुविधा उपलब्ध नाही.राज्यातील कोल्हापूर तसंच अन्य जिल्ह्यात कुस्तीसाठी उत्तम सुविधा आहेत. मराठवाड्यात गेल्या 75 वर्षांपासून या निर्माण झाल्या नाहीत, अशी तक्रार कुस्तीपटू कल्याण कोरडेनं व्यक्त केलीय.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा