इनर क्लब ऑफ बीड टाऊन व श्री श्री रविशंकर विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड प्रदान




इनर क्लब ऑफ बीड टाऊन व श्री श्री रविशंकर विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड प्रदा

बीड

श्री श्री रविशंकर विद्यामंदिर येथे इंटरनॅशनल इनर व्हील क्लब तर्फे दिला जाणारा नेशन बिल्डर अवॉर्डचा कार्यक्रम बुधवार 27 सप्टेंबर रोजी अतिशय उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने आणि दीपप्रज्वलाने झाली. इयत्ता सातवी आणि आठवीतील विद्यार्थिनी स्वागत गीत गायले. इंटरनॅशनल इनरव्हील क्लब व ऑफ बीड व श्री श्री रविशंकर विद्या मंदिर बीड यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात निस्वार्थपणे कार्य करणार्‍या श्री श्री रविशंकर विद्या मंदिर मधील उप मुख्याध्यापिका सौ.अनिता देविदासराव ढेगळे (सूर्यवंशी), राजकुमार अशोकराव वाव्हळ (संस्कार विद्यालय), शिक्षिका श्रीमती वर्षा शंकरराव उंडाळे (वाव्हळ), दत्तात्रेय काशिनाथराव कवचट (संस्कार विद्यालय), सौ.मीरा श्रीराम घोलप (कवचट) या पाच शिक्षकांना शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, गट शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे  यांच्या हस्ते नेशन बिल्डर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. या सर्वांना ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी तर गटशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, पवार सर, राऊत सर, इत्यादी मान्यवर व इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट बसंता कलंत्री मॅडम, सेक्रेटरी पूजा जाजू, प्रोजेक्ट मेंबर मंगला गुडे, विश्वेकर मॅडम, (संस्कार विद्यालयातील माजी शिक्षिका) अर्चना झोडगे, मंगल मस्के देवकण्या बंग, निर्मला कासट, पुष्पा कासट, शिवकन्या लाहोटी, शिला नेवडे, वैशाली पाठक इत्यादी मेंबर उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात गुरु विषयी महत्त्वाचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले व विद्यार्थ्यासमोर आपले प्रेरणादायी विचार मांडले. या कार्यक्रमासाठी शाळेचे अध्यक्ष जैन सर, शाळेचे सचिव संतोष पारगावकर, व सा.ै स्नेहा पारगावकर, मुख्याध्यापक हंसे, उपमुख्याध्यापिका अनिता सूर्यवंशी, शाळेतील सर्व शिक्षकवृंद आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सुषमा हावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे सचिव पारगावकर यांनी केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा