जिप माध्यमिक शाळा, ताडसोन्ना, बीडच्या खो-खो संघाची विभाग स्तरासाठी निवड




जिप माध्यमिक शाळा, ताडसोन्ना, बीडच्या खो-खो संघाची विभाग स्तरासाठी निवड

बीड

जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, ताडसोन्ना येथील 17 वर्ष खालील वयोगटातील मुलींच्या संघाने बीड जिल्हा स्तरीय स्पर्धेतील खो खो या सांघिक खेळामध्ये विजय प्राप्त करून तो संघ विभाग स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या संघास राष्ट्रीय खो खो प्रशिक्षक प्रफुल्ल हाटवटे, तुकाराम करांडे भागवत ठोकरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या
संघाची कर्णधार प्राची डावकर, सिद्धेश्वरी, गायत्री दराडे, नाईकवाडे रागिनी, जेठे रागिनी, राऊत दीपाली, घाडगे दीपाली, घुगे मयुरी, निकिता घाडगे, नाईकवाडे साधना निकीता गिरी, विद्या सपकाळ, सक्षी पवार, सय्यद शिफा
या खेळाडूंचा या संघात सहभाग होता. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शेळके श्रीहरी, गोडबोले श्रीवल्लभ, गाडे महेश, बीडकर विशाल, इसाक (मामु) शेख तसेच सरपंच सोमनाथ वडमारे, उपसरपंच बाळासाहेब नागटिळक सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किस्किंदा गायकवाड, उपाध्यक्ष मंगल मुंडे व सर्व सदस्य, सर्व पालक, ग्रामस्थ यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.*

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा