भारतातील प्रसिध्द खाद्यपदार्थाचे आदित्य शिक्षण संस्थेत प्रदर्शन




*विविध राज्यातील वेशभूषा परिधान करत विद्यार्थ्यांनी केला अगळा वेगळा जागतिक अन्न दिवस साजरा*
बीड । प्रतिनिधी
आदित्य शिक्षण संस्थेत सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत.  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी सलग्न व आदित्य शिक्षण संस्था संचालित आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यायातील विद्यार्थ्यांनी एक आकळ्या वेगळ्या पद्धतीने  जागतिक अन्न दिन 16 ऑक्टोंबर रोजी देशातील विविध राज्यातील वेशभूषा परिधान करत त्या त्या राज्यात प्रसिध्द असलेल्या चविष्ट खाद्य पदार्थांचे प्रदर्शन भरवत आपले वेगळे पण सिध्द केले. त्यांच्या या उपक्रमाचे आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. आदिती सारडा यांनी कौतूक केले.
जागतिक अन्न दिन दरवर्षी 16 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेची स्थापना प्रथम 1945 मध्ये झाली. उपासमारीवर कारवाई करणे हा या संघटनेचा उद्देश होता. त्यानंतर 1979 मध्ये पहिल्यांदा जागतिक अन्न दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी 16 ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन साजरा केला जाऊ लागला. हा दिवस साजरा करण्याचे विशेष महत्त्व आहे. अन्न दिनानिमित्त अन्न सुरक्षा आणि पौष्टिक आहाराची गरज याबाबत लोकांना जागरुक केले जाते. कोणत्याही शरीराला निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आहार अत्यंत आवश्यक आहे. आरोग्याची तसेच चवीची काळजी घेण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश महत्वाचे असल्याचे आदित्य शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विविध पौष्टिक पदार्थ बनवून सांगितले. यामध्ये  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी नवनवीन अन् वेगळे पदार्थ बनवून त्याचे पोस्टर प्रेसेंटेशन केले. विद्यार्थ्यांनी भारतामधील सर्व राज्यातील वेशभूषा परिधान करून त्या त्या राज्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थचे प्रदर्शन भरवले होते. या कार्यक्रमाची सुरुवात व रूपरेषा महाविद्यालयातील विद्यार्थी विनीत गिरी व रुपाली गिरी यांनी मांडली. जागतिक अन्न दिवस आणि त्याचे महत्व यावर पाचव्या सत्रातील विद्यार्थिनी वैष्णवी कडाव व शेवटच्या सत्रातील विद्यार्थी बादल चहांदे आणि वीरेंद्र राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी च्या कार्यकारी सदस्य तथा आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. आदितीजी सारडा मॅडम, डॉ. लहू हिंगणे, डॉ. अमोल सानप यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन महाविद्यालयातील प्रा. सोळंके ए. यु., प्रा. राठोड पी एस, प्रा. पुंडे एम. ए., प्रा. गुजर जी. एम. यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. श्याम भुतडा यांनी मानले.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा