प्राणिताताई देवरे -चिखलीकर याना नांदेड लोकसभेची जबाबदारी




प्राणिताताई देवरे -चिखलीकर याना नांदेड लोकसभा संयोजक पदाची जबाबदारी..
—————–

नांदेड/विशाल पवार

तेलंगणा राज्यातील संगारेड्डी विधानसभा मतदारसंघात जेथे भाजपा उमेदवारांसाठी मतदारांना पक्षाची ध्येयधोरणे पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न असो की पक्षाने वेळोवेळी दिलेल्या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात अग्रेसर असलेल्या भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे-चिखलीकर यांनी नांदेड लोकसभा महिला मोर्चा संयोजक पदी पक्षाने नियुक्ती केली आहे.त्याच्या या नव्या जबाबदारी मुळे पक्षाला महाविजय २०२४ अभियाना साठी फायदा होणार आहे

तीन राज्यात विजय संपादन केल्या नंतर भारतीय जनता पार्टीने राज्यात लोकसभा २०२४ महाविजय अभियान सुरू केले आहे. प्राणिताताई या पक्ष संघटनेत अतिशय जबाबदारीने काम करतात.तेलंगणा राजातील निवडणुकीत त्यांनी केलेले कार्याची पक्षातील वरिष्ठांनी दखल घेतली आहे..नांदेड लोकसभा मतदार संघात त्याचा दांडगा संपर्क आहे.प्रभावी वक्तृत्व ,सहजपणे महिला , नागरिकांत मिसळणे, लोकांच्या समस्या तातडीने सोडविणे त्यामुळे त्याचे नेतृत्व आता लोकप्रिय होताहे.मागील लोकसभा निवडणुकीत त्यांनी मतदारसंघातील जवळपास एक हजार गावांत जाऊन प्रचार केला होता त्यानंतरही पाच वर्षात या भागातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्या तत्पर असतात.त्यामुळेच प्राणिताताई यांचे नेतृत्व लोकमान्य झाले आहे
लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी ची तयारी व त्यात विजय मिळवण्यासाठीमहाविजय२०२४ अभियान भारतीय जनता पार्टी महिलामोर्चा महाराष्ट्रप्रदेश कडून प्राणिताताई देवरे चिखलीकर यांची नांदेड लोकसभा महिला मोर्चा संयोजिका म्हणून महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नियुक्ती केली आहे पक्षाला अभिप्रेत असणारे लोकसभेचे काम आपण कराल हा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे .नांदेड लोकसभा संयोजक पदी महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई यांची निवड झाल्याबद्दल त्याचे पक्षाच्या वतीने अभिनंदन होत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा