बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन




बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन करू- सातपुते, वरेकर

बीड
बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून दुष्काळी उपाययोजना लागू करा व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले असून नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी व पिक विम्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांना वाटप करावे,यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी बीड यांना शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने देण्यात आले.
देशात आणि राज्यात ई. व्ही. एम. मशीनद्वारे मतदान घेवून जनतेची
व मतदारांची फसवणुक केली जात आहे. देशभरामध्ये ई. व्ही. एम. मशीनच्या बाबतीत तीव्र संताप असून ई. व्ही. एम. मशीन द्वारे भा.ज.पा. निवडणुक प्रक्रियेत गैरप्रकार करत असून ई. व्ही. एम. मशीन यंत्राला छेडछाड करून आपले उमेदवार निवडुन आल्याचे दाखवण्याचे काम करत आहे. त्यामुळे आमच्यासहित देशभरातील नागरिक व मतदार यांचा प्रचंड रोष आहे त्यामुळे ई.व्ही.एम. मशिनवर आमची शंका असल्याने यापुढे होणाऱ्या निवडणुका पारदर्शक करायच्या असतील तर मतदान हे मतपत्रिकेद्वारे घेण्यात
यावे. संविधानाने दिलेल्या लोकशाहीचा हक्क अबाधित राहण्यासाठी व निवडणुका पारदर्शक होण्यासाठी या पुढील निवडणुका ह्या ई. व्ही. एम. मशीन ऐवजी मतदान पत्रिकेवर घेण्यात याव्यात.
राज्यात इंग्रजी पाट्या दुकानांना न लावता मराठी पाट्या लावण्यात याव्यात असे मा. उच्च न्यायालय यांचे आदेश आहेत त्या आदेशाची अंमलबजावणी आजपर्यंत आपल्या जिल्ह्यात झालेली नसून आपण तात्काळ सर्व संस्था, दुकानदारांना इंग्रजी पाट्या काढून मराठीत पाट्या लावण्याचे आदेशित करावे,आणि
वरील सर्व मागण्याची दखल तात्काळ घ्यावी नसता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी लोकसभा प्रमुख सुनील दादा धांडे, शिवसेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते सर जिल्हा प्रमुख गणेश भाऊ वरेकर व जिल्हा प्रमुख रत्नाकर आपा शिंदे, महिला जिल्हा प्रमुख संगीता ताई चव्हाण, वाहतूक सेना प्रमुख मशरू भाई पठाण, तालुका प्रमूख गोरख आण्णा शिंघन, शहर प्रमुख शेख निजाम भाई , जिल्हा संगटक नितीन भैया धांडे, उपजिल्हाप्रमुख सुशील पिंगळे, जिल्हा समन्वयक भाई संजय महाद्वार ,उपिल्हाप्रमुख शेख फर्जना भाभी, केज विधान सभा प्रमूख बाळासाहेब शेप, केज विधान सभा प्रमूख अशोक जाधव, रमेश नवले यांच्यासह शिवसनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा