अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर घंटानाद आंदोलन




अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर घंटानाद आंदोल

 

बीड

राज्यातील अंगणवाडी महिला कर्मचारी चार डिसेंबर पासून बेमुदत संपावर आहेत. सरकार आपल्या मागण्यांची दखल घेत नसल्याने आज सर्व अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी थाळीनाद आंदोलन केले.

4 डिेसेंबरपासून या अंगणवाडी सेविका, मदतनीस बेमुदत उपोषणावर आहेत. तरी सरकारने अद्याप त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही.त्या अनुषंगाने अंगणवाडी मदतनिसांमधून सेविकेची निवड करावी, या सेविकांमधून मुख्य सेविकेची निवड करावी, अंगणवाडी सेविकांना 26 हजार तर मदतनिसांना 22 हजार इतके मानधन 1 डिसेंबर 2023 पासून देण्यात यावे, पुरक पोषण आहाराचा दर प्रतिदिन 4 रुपये ठरविण्यात यावा, अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांचे पगार पीएफएमएस या प्रणालीद्वारे करण्यात यावे, दहावी मदतनिस असतील त्यांना थेट सेविका म्हणून नियुक्ती देण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळीनाद आंदोलन करण्यात आले व आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील अंगणवाडी मदतनिस आणि सेविका उपस्थित होत्या.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा