माजलगावात मातंग समाजाच्या वतीने जरांगे पाटलांचा सत्कार




माजलगावात मातंग समाजाच्या वतीने जरांगे पाटलांचा सत्कार
—-
माजलगाव, प्रतिनिधी
मतदारसंघात सभेनिमीत्त आलेले मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचा मातंग समाजाच्या वतीने भव्य मोठा पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील माउली फाटा येथील सभेनिमीत्त दि. 12 डिसेंबर 2023 रोजी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्ात दौरा करत आहेत. आज रोजी माजलगाव मतदारसंघात प्रवेश करताच मातंग समाजाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्री. जरांगे पाटील यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिनकर शिंदे यांनी भव्य मोठा पुष्पहार जरांगे पाटील यांना घालत त्यांचा जाहिर सत्कार केला. यावेळी जयपाल भिसे, दत्ता कांबळे, श्री. कसबे, दिलीप भिसे, भास्करनाना शिंदे, एकनाथ मस्के यांचेसह मातंग समाजबांधव व मराठा बांधव उपस्थित होते.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा