विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!




 

आदित्य कॉम्प्युटर्स येथे मोफत डिप्लोमा संगणक प्रशिक्षण – बाबासाहेब आडे

वडवणी

– छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र सारथी संस्थेचा उपक्रम महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लिमिटेड पुणे या प्रशिक्षण संस्थेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात तालुका स्तरापर्यंत कौशल्य विकास प्रशिक्षण मराठा कुणबी या लक्षित गटाच्या दहावी पास व १८ ते ४५ या वयोगटातील उमेद्वारकरिता महाराष्ट्रातील सर्व तालुक्यात सारथी संस्थेमार्फत निशुल्क मोफत व्यक्तिमत्व व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यासाठी लक्षित गटातील पात्र उमेदवारकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे .
सदर कार्यक्रम सारथी व महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लिमिटेड पुणे या प्रशिक्षण संस्थेमार्फत राबविण्यात येत असून वडवणी तालुक्यातील आदित्य कॉम्प्युटर्स या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश व आयटी स्किल्स हे दोन अभ्यासक्रम शिकवले जाणार असून व इतर दोन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना निवडायचे आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक ते स्किल्स शिकता येतील व विद्यार्थ्याला स्वत: च्या पायावर उभे राहता येईल. या स्पर्धयेच्या युगात मराठा समाजातील युवक युवती टिकले पाहिजेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सारथी व एमकेसीएल यांच्या वतीने सहा महिन्याचा संगणक डिप्लोमा कोर्स अगदी मोफत देण्यात येणार आहे. व विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी स्वावलंबी बनवण्यात येणार आहे.
सदरील कोर्सच्या प्रवेशासाठी व अधिक महितीसाठी www.mkcl.org/csmsdeep या संकेतस्थळाचा वापर करावा किंवा आदित्य कॉम्प्युटर्स वडवणी. या ठिकाणी संपर्क साधावा असे आव्हान आदित्य कॉम्प्युटर्सचे संचालक मा. श्री. बाबासाहेब आडे यांनी केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा