युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी गणेश उबाळे यांची निवड




युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी गणेश उबाळे यांची निवड

बीड

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी भेंड खुर्द येथील गणेश उबाळे यांची नियुक्ती करण्यात आली. गणेश उबाळे हे मागील चार वर्षापासून युवक काँग्रेस च्या माध्यमातून महाराष्ट्र भर काम करत आहेत. त्यांनी 2021 साली झालेली युवक काँग्रेस ची निवडणूकही लढवली होती आणि महाराष्ट्र भरातून तब्बल 5300 मतदान घेतले होते.

राहूल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन राहूलजी गांधी यांची भेट घेतली होती. युवक काँग्रेस हीच महाराष्ट्राला नवी दिशा देऊ शकते आणि महाराष्ट्रातील युवकांचे प्रश्न सोडवू शकते असं मत गणेश यांनी व्यक्त केले. भेंड खुर्द सारख्या ग्रामीण भागातून येत युवक काँग्रेस मध्ये आपलं स्थान कामाच्या जोरावर संघटनेत ओळख निर्माण केली आहे. गणेश सारख्या तरुण कार्यकर्ता मुळे काँग्रेस पक्षाला गेवराई तालुक्यात ताकत मिळू शकते. सदर नियुक्तीची सर्व स्तरातून जोरदार कौतुक आणि अभिनंदन होत आहे. कॉग्रेस पक्षाला बीड बरोबरच महाराष्ट्रभर बळकट करण्यासाठी आगामी काळात काम करू अशी गणेश उबाळे यांनी भावना व्यक्त केली.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा