धारूर महाविद्यालयामध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा व वैद्यकीय कार्यशाळा संपन्न




धारूर महाविद्यालयामध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा व वैद्यकीय कार्यशाळा संपन्न

किल्ले धारूर

येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी बालविवाह प्रतिबंधक कायदा व वैद्यकीय माहीती याविषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे हे होते.

विद्यार्थिनींना संबोधित करताना सांगितले की, या कार्यशाळेच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंधक कायदा व वैद्यकीय माहिती विषयी सविस्तर माहिती दिली. बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी माहिती झाल्याने विद्यार्थी याविषयी समाजात तत्पर राहतील असे सांगितले. या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र धारूर रुग्णालयातील कम्युनिटी हेल्थ ऑफिसर डॉ. भाग्यश्री निकते/भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बालविवाह प्रतिबंधक कायदा समजावून सांगितला कायद्यातील तरतुदी व संरक्षणाविषयी सविस्तर माहिती सांगितली. यामुळे विद्यार्थ्यांना बालविवाह संबंधित उद्भवणाऱ्या समस्या व दुष्परिणामांचीही जाणीव करून दिली. तसेच डॉ. अरविंद निकते यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा व वैद्यकीय बाबींचे विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगितली. आरोग्य विषयक प्रत्येकाने जीवनामध्ये सजग असले पाहिजे. असाही संदेश दिला. महाविद्यालयातील जीवशास्त्र विषयाचे प्रा. पर्यवेक्षक सिद्धेश्वर काळे यांनी प्रास्ताकातून शारीरिक बदल व समायोजन याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी विचारमंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. सिद्धेश्वर काळे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थिनींची, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन प्रा. प्रताप भानुसे यांनी तर आभार पर्यवेक्षक प्रा. सिद्धेश्वर काळे यांनी व्यक्त केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा