मोदी सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले – प्रज्ञा खोसरे




 

बीड !

अच्छे दिन आणू म्हणणाऱ्या मोदींना सत्तेवर आल्यानंतर महागाई रोखता आली नाही . आता तर रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ करण्यास कंपन्यांना मुक संमती देवून ते तर शेतकऱ्यांच्या जीवावरच उठले आहेत . अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सरचिटणीस अॅड.प्रज्ञा खोसरे यांनी व्यक्त केली आहे . ‘ मोदी मतलब महंगाई ‘ , मोदी साहेब स्वत : चा संसार नसला तरी देशातील लोक हे संसारिक आहेत , त्यांच्या दैनंदिन गरजा गॅस , पेट्रोल , आणि डिझेल ह्या आहेत . याचे जरा भान ठेवा . पेट्रोल , डिझेल , गॅस यांच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढवलेल्या आहेत . या किंमतीही कमी करण्यास आपण ठोस असे कोणत्याच उपाय योजना केलेल्या नाहीत . आता तर रासायनिक खतांची दरवाढ करण्यास कंपन्यांना मुख संमती देवून तुम्ही शेतकऱ्यांच्या जीवावरच उठलात . मोदी साहेब ही मस्ती नेमकी कशासाठी ? असा सवाल अॅड . प्रज्ञा खोसरे यांनी उपस्थित केला आहे .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा