अखेर राम , लक्ष्मणाचा मारेकरी परमेश्वरला’ , भुतेकरांनी घातल्या बेड्या!




अखेर राम , लक्ष्मणाचा मारेकरी परमेश्वरला’ , भुतेकरांनी घातल्या बेड्या , आरोपी परमेश्वर नागापुर (खुर्द )मधील एका पडक्या घरात बसला होता लपुन

बीड ! जुन्या वादातून कुऱ्हाडीने घाव घालत दोन भावांची निघृणपणे हत्या करण्यात आल्याची नागपूर ( खुर्द. ) येथे सोमवारी रात्री 11 वाजता घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी परमेश्वर साळूके यास तीस तासाच्या आत जेरबंद करण्यात ए पी आय शरद भूतेकर यांना यश मिळाले आहे . 15 दिवसांपूर्वी गावातील परमेश्वर साळुंके याने राम साळुंके ( 50 ) व लक्ष्मण साळुंके ( 47 ) या दोन्ही भावांना शिवीगाळ केली होती . तेंव्हा हा वाद आपसात मिटला होता ; परंतु सोमवाटी परमेश्वरने या दोघांना फोनवरून शिवीगाळ केली . याबाबत त्याला समजवण्यासाठी रात्री अकरा वाजता राम व लक्ष्मण साळुंके दोघे गेले होते . यावेळी भररस्त्यात त्यांच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून निघृण खून करण्यात आला . या घटनेनंतर उपअधीक्षक संतोष वाळके , सहायक पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली होती . या प्रकरणी परमेश्वर साळुकेविरुद्ध पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . या घटनेनंतर संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला होता . पिंपळनेर पोलिस ठाण्याचे एपीआय शरद भुतेकर यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत घटनेच्या तीस तासाच्या आत आरोपीला पकडून बेड्या घालण्यात आल्या आहेत .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा