कोरोनावर मात केल्यानंतर 3 महिन्यांनी लस ; नव्या गाईडलाईन्स जारी




मुंबई : कोरोनावर मात करुन घरी परतलेल्या व्यक्तीने कोरोनाची लस कधी घ्यावी, असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. त्यावर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आले आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर आता तुम्ही 3 महिन्यांनी लस घेऊ शकणार आहात. कारण एनईजीव्हीएसीने दिलेल्या सूचनांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. एनईजीव्हीएसीने केलेल्या सूचनांमध्ये एखादा व्यक्ती कोरोनामुक्त झाल्यावर त्याला 3 महिन्यांनी कोरोना लस द्यावी असे सांगण्यात आले होते. त्यांची ही सूचना आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अमलात आणण्याचा निर्णय घेतलाय.

एनईजीव्हीएसीने केलेल्या सूचनानंतर एखादा व्यक्तीला कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला, तर त्याने कोरोनामुक्त झाल्यानंतर 3 महिन्यांनी दुसरा डोस घ्यावा. त्याचबरोबर आपल्या बाळांना स्तनपान करणाऱ्या महिलांनाही कोरोनाची लस दिली जावी असे एनईजीव्हीएसीने म्हटले आहे. तसेच कोरोनाची लस घेण्यासाठी गेलेल्या लोकांची अँटिजन टेस्ट करण्याची गरज नसल्याचे देखील स्पष्ट केले आहे.

लसीकरणाबाबत एनईजीव्हीएसीच्या 4 सूचनांना मंजुरी
1. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला 3 महिन्यानंतर कोरोना लस दिली जाऊ शकते.
2. कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर कोरोनातून बरे झाल्यानंतर 3 महिन्यांना दुसरा डोस घ्यावा.
3. आपल्या बाळांना स्तनपान करणाऱ्या माताही कोरोना लस घेऊ शकतात.
4. कोरोना लस घेण्यापूर्वी रॅपिड अँटिजन टेस्ट करण्याची गरज नाही.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा