डॉ . सुर्यकांत गीते यांची तात्काळ बदली करा;पालकमंत्र्यांना निवेदन




डॉ . सुर्यकांत गीते यांची तात्काळ बदली करा – बहीर , मस्के , बागलाने , खोड यांची मागणी
बीड ( प्रतिनिधी ) जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गीते यांची तात्काळ बदली करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी मार्फत पालकमंत्री धनंजय मुंडे यांना विविध सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
सध्या बीड जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे दिवसाला पूर्ण जिल्ह्यात कित्येक माणसे मृत्युमुखी पडत आहेत एकीकडे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात कोरोनाचा आकडा कमी होत असताना दुसरीकडे मात्र आपला बीड जिल्हा कोरोना बाधितांच्या संख्येत अजूनही हजारोच्या संख्येत आहे अशा वेळी आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसून येत आहे पालकमंत्री साहेब आपण जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गीते यांना आणले असल्याचे बोलले जात आहे परंतु डॉ.गीते यांचा कारभार चांगला नसल्याचे बोलले जात आहे अनेक दैनिकातून डॉ . गीतेचा कारभार योग्य नसल्याचे येत आहे तरी मा.पालकमंत्री साहेबांनी बीड जिल्ह्यातील जनतेचा विचार करून डॉ . गीते यांचे तात्काळ बदली करावी अशी मागणी बुलंद छावाचे बीड जिल्हाध्यक्ष विठ्ठल बहीर ,राष्ट्रीय छावाचे बीड जिल्हाध्यक्ष युवराज मस्के संभाजी ब्रिगेड कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत बागलाने ,रामनाथ खोड यांनी जिल्हाधिकारी मार्फत पालकमंत्री धनंजय मुंडे यांना केली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा