अकार्यक्षम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.गित्तेना हटवा- वाकसे




 

चिंचवन प्रतिनिधी !

बीड जिल्ह्यात सध्या खूप मोठ्या प्रमाणात दररोज कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत, मात्र जिल्हा प्रशासन नियोजनात कमी पडताना दिसत आहे. गोरगरीब कष्टकरी रुग्णांना वेळेवर रेमदेसिविर इंजेक्शन आणि अन्याय औषधी मिळत नाहीत, ऑक्सीजन बेड लवकर मिळत नाही अतिशय गरीब असलेल्या रुग्णांना तर पाहायलाच कोणी तयार नसते बीड जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत, गेल्या दीड महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये लोकडाऊन सुरू आहे गेल्या दिड महिन्याच्या काळापासून गोरगरीबवर उपासमारीची वेळ आलेली आहे .व्यापार उद्योग रोजगार बंद असल्याने, सर्वजण देशोधडीला लागत आहेत. मात्र आधी आरोग्य महत्त्वाचे म्हणून सर्वांनी प्रशासनाला साथ देत सहकार्य केले मात्र दीड महिन्याच्या कालावधीमध्ये प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना काही करता आले नाही. जिल्ह्यात रुग्णांची संख्या कमी करता आली नाही .उपचाराच्या सुविधा वाढवता आले नाहीत .हातात असलेली यंत्रणा देखील कामाला लावता आली नाही. ऑक्सीजन रेमदेसिविर आणि बेड देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध करता येऊ शकले नाहीत. मग सामान्य नागरिक व्यापारी गरीब कामगार यांनी कुठपर्यंत सहन करायचे। पालकमंत्री राज्यकर्ते आणि प्रशासनाची काही जबाबदारी नाही काय.? असा प्रश्न उपस्थित करत धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाकसे यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.  बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.गीते यांचे कर्मचाऱ्यांनवर नियंत्रण नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत. सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही ! सर्वसामान्याला बेड मिळत नाही सर्वसामान्यांना ऑक्सिजन मिळत नाही! त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होताना दिसत आहेत. व अकार्यक्षम असलेले जिल्हा शल्यचिकित्सक गिते यांना पालकमंत्र्यांनी विशेष लक्ष घालून तात्काळ हटवावे असे दत्ता वाकसे यांनी म्हटले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा