मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर लिंबागणेश येथे अपघात




 

लिंबागणेश !

मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर लिंबागणेश शिवारात राजयोग ढाबा शेजारी रात्री 12 वाजता रोहित प्रदिप शिंदे आई, वडील, बहिण यांच्यासह पोहरेगाव ता.रेणापुर जि. लातुर येथून पुणे येथे रवाना होत असताना डुलकी लागल्यामुळे गाडी( ब्रिजा एम. एच. 14 एच. के. 3626) पलटली, गाडीतील माणसांना दुखापत नाही, रात्री लिंबागणेशचे बाळासाहेब मुळे व पोखरीचे ऋषिकेश खिल्लारे यांनी गाडीतुन बाहेर निघण्यास मदत केली.

गाडीचे टायर, टेप, स्टेपनी चोरट्यांनी पळवली
रात्री घडलेल्या अपघातात काहींनी मदत केली तर याचवेळी मध्यरात्री संवेदनहीन चोरट्यांनी गाडीचे चारही चाक, गाडीतील टेप, स्टेपनी चोरीला गेले. गाडीतील टेप काढण्यासाठी दगडाने काच फोडली. नेकनुर पोलीस ठाण्याचे स.पो.नि.लक्ष्मण केंद्रे यांना माहिती दिली त्यांनी लिंबागणेश पोलीस चौकी जमादार राऊत संतोष यांना घटनास्थळी येऊन स्थळपंचनामा केला.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा