इम्युनिटी वाढवणार्‍या सेंद्रिय भाजीपाल्यावर भर




अंबाजोगाई : कोरोना सोबत लढा देताना शारीरिक आरोग्य अबाधित रहावे. या साठी नागरिक इम्युनिटी वाढवणारे अन्नपदार्थ घेण्यावर भर देत आहेत. यातुन भाजीपाल्याला सर्वाधिक पसंती असुन शेतकरीही विविध भाज्यांची लागवड वाढवत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून माणसाची जीवनपद्धती बदलत चालली आहे. सध्या आहारातून रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवता येईल याला प्राधान्य दिले जात आहे. जीवनसत्व वाढविणारी फळे व भाजीपाला याला महत्व प्राप्त झाले आहे. नागरिकांची ही मागणी पाहून शेतकर्यांनी ही आपला मोर्चा इम्युनिटी वाढवणार्या भाज्या व फळे लागवडीकडे वळविला आहे. लिंबु, आद्रक, पुदिना, हळद या अपारंपरिक पिकासह पारंपारिक भाजीपाला पिकांना पसंदी दिली जात आहे. 60 ते 90 दिवसात येणारा हा भाजीपाला शेतकर्यांना आर्थिक दृष्ट्या तर नागरिकांना शारीरिकदृष्ट्या सक्षम करणार आहे.

कोरोनामुळे भाजीपाला लागवड करून तो सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यावर शेतकर्यांचा भर आहे. शारीरिक क्षमता वाढविणार्या भाजीपाल्याला मोठी मागणी वाढली आहे. युवक शेतकर्यांनी जोडधंदा म्हणून सेंद्रिय भाजीपाला व फळ लागवड सुरु केली आहे. गेल्या दोन वर्षा पासुन मी सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन घेतो. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्या पासून सेंद्रिय व इम्युनिटी वाढवणार्या भाजीपाल्याला मागणी वाढली असल्याची माहिती शेतकरी गणेश रुद्राक्ष यांनी दिली.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा