चिंचोळीमाळी फाटा येथे कोविड केअर सेंटरचे – बजरंग सोनवणे यांच्या हस्ते उदघाटन




आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचा मला रास्त अभिमान आहे – उपाध्यक्ष सोनवणे
युवा ग्राम आश्रमात १०० बेडची सुविधा

केज । चिंचोली माळी येथे युवा ग्राम विकास मंडळ यांच्या सहकार्याने युवा ग्राम आश्रमात १०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले. कोविड केअर सेंटर चे उदघाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा आरोग्य धिकारी बीड चे श्री. डॉ. आर.बी.पवार तसेच प्रमुख उपस्थिती केजचे नायब तहसीलदार श्री.धस, तालूका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले,युवा ग्रामचे सर्वेसर्वा श्री.एच.पी.देशमुख उपस्थित होते.या कोविड केअर सेंटरचे युवा ग्रामचे अध्यक्ष बी.के.कापरे,कार्यकारी सचिव एच.पी.देशमुख व सर्व संचालक मंडळ यांनी नियोजन केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा