कामचुकार पणा भोवला; डॉ. नर्ससह सात जण कार्यमुक्त




जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा दणका

आष्टी: येथील कोवीड सेंटरमधील रूग्णांच्या सेवेत कुचराई करणाऱ्या १ डॉक्टरसह ७ जणांना शनिवारी पहाटे अचानक डीएचओ डॉ . आर.बी.पवार यांनी भेट देऊन ७ जणांना कार्यमुक्त केल्याचे कारवाई केली आहे.यामुळे कामचुकारांचे धाबे दणाणले आहेत . आष्टी येथील कोवीड सेंटमध्ये उपचार घेत असलेले रूग्ण बाहेर फिरताना डॉ.पवार यांना भेटी दरम्यान आढळून आले , डॉक्टर , परचारिका उपचाराकडे दुर्लक्ष करतात , वॉर्डबॉय स्वच्छता करत नाहीत , अशा तक्रारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या . त्यांनी याची गंभीर दखल घेत आष्टी गाठत कोवीड सेंटरची तपासणी केली . यात त्यांना भरपूर त्रूटी दिसल्या . तसेच कामात हलगर्जी झाल्याचेही दिसले . त्यांनी क्षणाचाही विलंब न करता येथे कर्तव्यावर असणाऱ्या डॉ.माधूरी पाचरणे , या डॉक्टरसह अश्विनी पानतावणे , रूपाली काळे आणि वार्डबॉय निखिल वाघुले , आकाश राऊत , सुमित धोंडे , आणि भारत राऊत यांना तडकाफडकी कार्यमुक्त केले या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा