मोदी आणि भाजपच्या अहंकारामुळेच देशाची स्मशानभूमी बनली”




रायगड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. मृत्यूचे प्रमाण चिंताजनक बनलेय. अशावेळी म्युकरमायकोसिस नव्या आजाराने तोंड वर काढलेय. म्युकरमायकोसिसमुळेही अनेकांचे जीव जात आहेत. त्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारने देशाची स्मशानभूमी केली आहे. त्यांच्या अहंकारामुळे देश स्मशानभूमी बनला असल्याची टीका पटोले यांनी केली. ते आज रायगड दौऱ्यावर होते. तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी त्यांनी केलीय.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची थट्टा करण्याचे काम केंद्र सरकार आणि भाजपने केलेय. भाजपच्या अहंकारामुळे देशाची स्मशानभूमी बनली आहे. केंद्र सरकारचा ढिसाळपणा, नियोजन शून्यता, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या नियमांचे पालन न करणे, यामुळेच देश स्मशानभूमी बनलीय. देशातील कोरोना स्थितीमुळे पंतप्रधानांवर जागतिक पातळीवर टीका होत आहे, असेही पटोले म्हणाले. तसेच, पटोले यांनी भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलेय. विदूषक कोण हे पश्चिम बंगाल आणि देशाने दाखवून दिलेय. खरा हिरो कोण आहे हे ही जनताच ठरवेल, असेही पटोले म्हणाले.

पंतप्रधान मोदी वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधताना अत्यंत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, ‘मोदी भावूक होऊ शकतात यावर विश्वास बसत नाही. मोदींचे खेला होबे सुरु होते. देशाला स्मशान केले आणि आज ते भावूक होत असतील यावर विश्वास बसत नाही. पंतप्रधान मोदींची प्रतिमा ढासळली आहे. त्यामुळे प्रतिमा सुधारण्यासाठी अश्रू ढाळत असतील तर जनता मान्य करणार नाही. बनारस मॉडेलमध्ये गंगेत मृतदेह वाहताहेत. त्यांचे ते स्वप्न असेल तर त्यांना कळायला हवे की कुत्र्या-मांजरासारखे लोकांना मरायला सोडलेय. त्यांचा हा पॅटर्न आम्ही महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, अशी घणाघाती टीकाही पटोले यांनी मोदींवर केली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा