गाव तलावात बोगस क्षेत्र संपादित करून कोट्यवधीचा शासनाला गंडा – प्रा.सचिन उबाळे

बीड।

तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे लघु पाटबंधारे विभागाचा अतिरीक्त पदभार असताना त्यांनी गाव तलाव क्र 10 मौजे धनगर जवळका या तलाव साठी जमीन भूसंपादन केली  सदर तलावा चा प्रस्ताव प्राप्त झाल्या नंतर प्रस्ताव मोजणी साठी उप अधीक्षक भूमी अभिलेख पाटोदा पाठवला भूमी अभिलेख यांनी मोजणी करून  तलावा साठी 1.21 हे.आर क्षेत्र संपादित होत असले बाबत कळवले.परुंत संबंधित अधिकारी कर्मचारी आणि वकील यांनी संगमत करून उप अधीक्षक भूमी अभिलेख पाटोदा यांनी 1.27 हे.आर ची मोजणी बदलून 4.27 हे.आर असे क्षेत्र दाखवले आणि त्याचा निवडा करून जवळपास 3 हे.आर चे जास्त पैसे यांनी संगनमत करून स्वतः च्या घशात घातले.या प्रकरणी आता संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावे अशी मागणी स्वाभिमान संघटनेचे जिल्हाप्रमुख प्रा.सचिन उबाळे यांनी केली आहे.
पाझर तलाव भायाळ ता.पाटोदा गाव तलाव 3 धनगर जवळका गाव तलाव 5 वडझरी ता.पाटोदा तसेच गाव तलाव 5 भुरेवाडी ता पाटोदा या सर्व संचिकेतील मोजणी ह्या चंद्रकांत सूर्यवंशी व कर्मचारी वकील यांनी संगनमताने बदलून करोडो रुपये बोगस उचलले आहेत तसेच मला माहिती अधिकारात माहिती अर्ज दिला असता मौजे भुरेवाडी या संचिका मधील  कागदपत्रे मिळाले नाहीत कारण ही संचिका गहाळ केलेली आहे या चंद्रकांत सूर्यवंशी ने कित्येक प्रकरणात आजून शासनाला फसवले आहे तरी मा साहेबांना माझी विनंती आहे की अश्या अधिकायाला शासन सेवेतून निलंबीत करून भष्ट्राचार झालेली रक्कम यांच्या कडून वसूल करावी.
तसेच मागील दोन महिन्या पूर्वी मी याच सूर्यवंशी विरोधात  भूसंपादन लवाद विभागात माहिती अधिकार टाकला होता याने तेथील कर्मचारी वखरे यांना सांगितले होते की तु त्याला माहिती देऊ नको लवाद मध्ये पण याने करोडो रुपयांचा भष्ट्राचार केलेला आहे हे मला संबधीत विभागाचे कर्मचारी वखरे यांनी सांगितलें आहे तत्कालीन जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग व सूर्यवंशी यांनी करोडो रुपयांचा भष्ट्राचार केलेला आहे त्यांची तक्रार मी या आधीच आपल्यांकडे केलेली आहे, तसेच शिरूर कासार तालुक्यात सुद्धा गाव तलावामध्ये अश्याच प्रकारचे भ्रष्टाचाराचे प्रकरण दडलेले आहे,तरी साहेबाना माझी विनंती की या असल्या भष्ट्राचारी अधिकारी यांच्या विरोधात सर्व पुरावे मी आपणास देतो त्यांच्यावर तात्काळ निलंबणाची कार्यवाही करून शासनाची फसवणूक केलेली रक्कम त्यांच्या कडून वसूल करावी व चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या संपत्तीची चोकशी करावी,अशी मागणी निवेदनाद्वारे स्वाभिमान संघटनेचे जिल्हाप्रमुख प्रा.सचिन उबाळे यांनी केली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा