कोरोनामुळे पालक गमावलेल्यांना मिळणार मदत




औरंगाबाद l कोरोना संसर्गामुळे आई-वडिलांपैकी एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांच्या न्याय्य हक्काबरोबरच शासनाच्या योजनांचा तात्काळ लाभ देण्यात येणार आहे. यासोबतच विधवा महिलांनाही संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार आहे, याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधित यंत्रणेला मंगळवारी दि.8 सूचना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा कृती दलाची मंगळवारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत त्यांनी संबंधित सूचना केल्या. एक पालक गमावलेल्या 326 आणि दोन्ही पालक गमावलेल्या 13 अशा एकूण 339 बालकांना शासनाच्या नियमानुसार असणार्‍या सर्व योजनांचा तसेच 265 विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ तत्काळ देण्यात यावा, अशा सूचना संबंधित अधिकार्‍यांना चव्हाण यांनी केल्या. दोन्ही पालक गमावलेल्या 13 बालकांपैकी तीन बालकांना बालगृहात प्रवेशित करण्यात येणार आहे. तर 10 बालकांना बाल कल्याण समितीसमोर उपस्थित करून दरमहा 1100 रूपये प्रतिमाह योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. लाभ देण्याची कार्यवाही आठवडाभरात पूर्ण करावी, अशा सूचना चव्हाण यांनी केल्या आहेत. आगामी काळातील कोरोना संक्रमणाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन बालकांच्या काळजीबाबत जनजागृती करावी, यासाठी विविध सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी, असे डॉ. गव्हाणे यांनी सांगितले. हर्षा देशमुख यांनी जिल्ह्यातील पालक, बालक यांच्याबाबत सविस्तर माहिती बैठकीत सादर केली.

चाईल्ड हेल्पलाइनचे साहाय्य : चोविस तास सुरू असलेल्या चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1098 मार्फत जिल्ह्यात कोरोनामुळे 30 बालकांनी पालक गमावल्याची नोंद झाल्याची माहिती उगले यांनी दिली. हेल्पलाईनच्या माध्यमातून मार्च 2020 पासून ते आजपर्यंत 465 बालकांना अन्नधान्य पुरविल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा