केंद्र राज्यसरकार कंपन्याना मिळुन नफेखोरी करण्यासाठी बीड पिक विमा मॉडेल




बीड मॉडेल म्हणजे शेतकर्याच्या घरावर दिवसा दरोडा- भाई मोहन गुंड

बीड l  जिल्ह्यात भारत सरकार पंतप्रधान पिक योजना साठी पिकविमा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जवळपास
१७ लाख ९० शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्यापैकी
10 ते 15 हजार लोकांना वाटप झाल्याचा अंदाज आहे शेतकर्यांनी विमा भरलेच्या तुलनेत पाच दाहा टक्के ही रक्कम शेतकर्याना मिळाली नसल्याचे पत्रक शेकापचे भाई मोहन गुंड यांनी दिले आहे.

सन 2020 हांगामात अतिवृष्टी झाली हाताला आलेले पीक शेतकऱ्यांचे जाग्यावर पाण्याने गेले, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान झाले म्हणून तक्रार करायला सागीतल्या त्या ही ऑनलाईन काही शेतकऱ्यांच्या तक्रारी ही ऑनलाईन झाल्या नाहीत 72 तास वेळ दिला सर्वच शेतकऱ्यांना अॅनलाईन करता येत आस नाही, तक्रार अॅफलाईन देखील तक्रार घेतल्या नाहीत
तरी जवळपास चार साडेचार पाच लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर आले, त्यात 20 हाजार शेतकर्यान फक्त 13,14 कोटी वाटप झालल्याचे समोर आलं,मग उर्वरित शेतकरी आजुन पिक विमा पासून वंचित आहेत,आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व सहकाऱ्यांना घेऊन पंतप्रधानांकडे बीड मॉडेल म्हणून राबवण्यची विनंती करतात राज्य सरकार नी अगोदर बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे काय हाल आहेत काय परिस्थिती आहे ते बघुन जिल्ह्यातील शेतकर्यांचे पैसे द्यावेत, नंतर मॅडेल ठरवावे बीड मॅडेल राबवणे म्हणजे शेतकर्यांचा घरावर दिवसा दरोडा टाकल्या सारखे आहे.
या मॉडेलमध्ये राज्य सरकार विमा कंपन्या गब्बर करण्यासाठी पंतप्रधानांकडे या मॉडेलची मागणी केली आहे राज्य सरकारांनी पिक विमा कंपन्या यांचे साटेलोटे बंद करावे शेतकऱ्याने कष्टाचे पैसे भरलेली त्यांना त्याचा मोबदला मिळावा कोरोना च्या काळात पेरणीला शेतकऱ्याकडे एक पैसा नाही कोणी खाजगी सावकाराकडून तर कोणी उसने पासने करून पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी कुठलीही माहिती न घेता बीड मॉडेल राबवावा अशी मागणी करून बीड जिल्ह्याचे नाव बदनाम केले आहे हाच पर्यटन महाराष्ट्रामध्ये राबविल्यास शेतकरी देशोधडीला लावल्याशिवाय राहणार नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चौकशी करून उर्वरित शेतकऱ्याचा हक्काचा पिक विमा तात्काळ वाटप करावा या साठी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य मध्यवर्ती समिती सदस्य भाई मोहन गुंड यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे अन्याय आंदोलन करु असा इशारा दिला आहे .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा