दीड महिन्यांनंतर लालपरी येतेय रुळावर




तब्बल दीड महिन्यांनंतर राज्य शासनाने लॉकडाउन शिथिल केल्यानंतर उमरगा आगराची लालपरी वाहतूक सोमवारपासून रस्त्यावर पुन्हा धावू लागली आहे. लालपरी धावू लागल्याने प्रत्येक नागरिकाच्या मनात विश्वास तर निर्माण झालाच, कोरोनाची भीतीही काही प्रमाणात कमी झाली असल्याचे दिसून येत आहे. उमरगा आगाराचे उत्पन्न सुरू झाल्याने वाहक-चालकांसह कर्मचारी व अधिकार्‍यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाच्या संकटाने अनेक उद्योग, व्यवसाय डबघाईला आले आहे. त्यात एसटी महामंडळही सुटलेले दिसत नाही. दीड महिन्यानंतर पहिलाच दिवस असल्याने प्रवाशांचा समाधानकारक प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशी लालपरीने 4 हजार 325 किलोमीटर अंतर प्रवास केला आहे. त्यामध्ये 1 हजार 926 प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सहाजिकच उत्पन्न कमी म्हणजे 95 हजार 33 झाले असले तरी सायंकाळपर्यंत एसटीने प्रवाशांच्या सेवेत 66  फेर्‍या पूर्ण केल्या. दीड महिन्यानंतर वाहक, चालक, कर्मचारी, अधिकारी पुन्हा जोमाने कामाला लागले असून सेवा सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन करीत आहेत. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास एसटीचा प्रवास पूर्ववत सुरू होईल. शिवाय बस फेर्‍याही वाढविण्यात येतील असे आगार प्रमुख प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा