देशातील प्रत्येक देवस्थान ठिकाणी संस्कृती शिक्षणास मंजुरी द्या-प्रशांत सुलाखे




बीड ।
भारतीय संस्कृतीची जपवणूक करण्याच्या दृष्टीने देशातील मोठ्या देवस्थानच्या ठिकाणी मदरशा प्रमाणेच संस्कृती शिक्षण सुरू करावे तसेच शासनाने यासाठी स्वतंत्र अनुदान द्यावे अशी मागणी परशुराम सेवा संघाचे मराठवाडा मार्गदर्शक प्रशांत सुलाखे यांनी केली आहे

भारतीय संस्कृतीचे जतन,प्रसार आणि प्रचार करून शालेय शिक्षणाबरोबर आपल्या संस्कृतीचे शिक्षण देणे देखील तितकेच महत्वाचे आहे,या ठिकाणी,संस्कृत,वेद शिक्षण,सर्व धर्म ग्रंथाचा अभ्यास,प्रवचन,वारकरी संप्रदायाचे शिक्षण,तसेच भारतीय पारंपारिक संस्कृतीचे शिक्षण दिले जावे,येथे चारही वेदांचा अभ्यासक्रम मुलांना मिळावा,वेद शास्त्रात पारंगत असणाऱ्या व्यक्तींची याठिकाणी शिक्षक म्हणून नियुक्ती करावी,मदर्शा प्रमाणेच या संस्थेस शासकीय अनुदान देण्यात यावे तसेच शिक्षकांना निवृत्तीवेतन लागू करावे,शासना बरोबरच देशातील मोठ्या देवस्थान समितीच्या वतीने आशा विद्यालायाना इमारत,वसतिगृहे आणि मुलांना स्टायफंड देण्यात यावा,जेणे करून पालकांना दिलासा मिळेल,केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारनेही यासाठी 50%अनुदान द्यावे,यामुळे ज्या विद्यार्थ्यांना वेद शिक्षण,धार्मिक शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे शिक्षण महत्वाचे ठरेल,शासनाने या शिक्षणास त्वरित मंजुरी देऊन संपूर्ण देशात मुलांसाठी हे शिक्षण सुरू करावे अशी मागणी परशुराम सेवा संघाचे मराठवाडा मार्गदर्शक प्रशांत सुलाखे यांनी केली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा