कोरोना काळात गरिबांनाची सेवा केल्याने रुग्णासाठी डॉ.गणेश ढवळे देवमाणूस




बोरखेड-वडवाडी तसेच पवार – पारधी वस्तिवर विनामूल्य आरोग्य सेवा देणारे  डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

बीड । तालुक्यातील बोरखेड-वडवाडी गावामध्ये ग्रामसमृद्धी चळवळ अंतर्गत सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर आयोजित विनामूल्य आरोग्य शिबिरात कोरोनाविषयक जनजागृती, तपासणी व औषधोपचार आज दि.10 जुन गुरूवार,रोजी करण्यात आले,
ग्रामीण भागातील वैद्यकीय तसेच औषधीदुकान नसलेल्या भागातील ग्रामस्थांनी अंगावर दुखणे काढु नये तसेच गैरसमजातुन दवाखान्यात जाण्याची सुविधा नसलेल्या तसेच लाॅकडाऊन मुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या गोरगरीब ग्रामस्थांना विनामूल्य तपासणी व औषधोपचार करण्यात येत आहेत ,या उपक्रमात शालेय शिक्षण समिती अध्यक्ष आत्माराम शिंदे ,माजी सरपंच सुनिल अनपट, ग्रामरोजगार सेवक तुकाराम कवडे, रायचंद सोनटक्के,विनोद साठे आदिंनी सहकार्य केले.

शासनाने वाळीत टाकलेल्या पारधी वस्तिवर विनामूल्य आरोग्य सेवा – देणारे डाॅ.गणेश ढवळे 

लिंबागणेश ते बोरखेड दरम्यान बोरखेड-वडवाडी ग्रांमपंचायत अंतर्गत पवार पारधी वस्तिवर शासनाच्या घरकूल आदि.कोणत्याही योजना तर नाहीतच परंतु पिण्याचे पाणी, शौचालय आदि मुलभूत सुविधा नसून जिवघेण्या विहीरीतुन महीलांना पाणी शेंदावे लागते ,ब-याचवेळा पाणी शेंदतानानामूल्य तोल जाऊन विहीरीत पडल्याच्या दुर्घटना घडलेल्या आहेत, शासनाने वाळीत टाकलेल्या पारधी समाजाला निदान माणुस म्हणून मुलभुत सुविधा द्याव्यात अशी त्यांची आर्त विनवणी आहे, आज त्या पवार वस्तिवर विनामूल्य आरोग्य सेवा देण्यात आली.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा