सचिन मडावी यांच्या आश्वासनाने आश्रम शाळेच्या कर्मचार्‍यांचे उपोषण स्थगित




प्रादेशिक उपायुक्त यांच्या आदेश कायम राहणार आणि तात्काळ वैयक्तिक मान्यता देण्याचे सहआयुक्त सचिन मडावी यांनी आश्वासन दिल्या नंतर कर्मचारी उपोषण पाठीमागे.

बीड । दि.10 सविस्तर वृत्तांत असे की पाथरा ता. केज जी.बीड येथील आश्रम शाळा कर्मचारी यांचे संस्थाचालक यांनी आणुदान आल्यावर आम्हाला आतीरिक्त पैशाची मागणी करत काढून टाकले त्या तक्रारीवर प्रादेशिक उपायुक्त यांनी साक्षी पुरावे पडताळणी करून सुनावणी घेऊन दि.24 मार्च 2021 रोजी संस्थाचालक यांना पुन्हा कायम फेर नियुक्तीचे आदेश पारित केले तो आदेश येऊन तीन महिने होत आहेत. तरी संस्थाचालक रुजू करून घेत नाहीत सह.आयुक्त बीड यांना अनेक वेळा तक्रार देऊनही कार्यवाही होत नाही म्हणून प्रादेशिक उपायुक्त यांच्या आदेशाची तात्काळ अमलबजाणी करा आमच्या वयक्तिक मान्यता द्या सदरील संस्था तात्काळ शासनाच्या ताब्यात घ्या अशा विविध मागण्यासाठी दि.1 जून 2021 रोजी पासून शाळेच्या समोरच बसले होते उपोषणाला त्यावर सह.आयुक्त यांनी दखल घेत 5 जून 2021 रोजी उपोषणाला दिली भेट आणि संस्थाचालक यांनी रुजू करून नाही घेतले तरी हा आदेश कायम राहील आणि त्या आदेशा प्रमाणे तुम्ही या शाळेचे नियमाने कर्मचारी आहेत, वैयक्तिक मान्यता देतेवेळी पहिल्यांदा तुम्हालाच वयक्तिक मान्यता देण्यात येतील हे आश्वासन दिले शासनाकडून योग्य ती कार्यवाही होत आहे आणि आपली दखल घेत आहेत म्हणून तात्पुरत्या स्वरुपात बेमुदत आमरण उपोषण घेतले मागे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा