राज्य गुणवत्ता निरीक्षकांनी रस्त्याच्या कामाची तपासणी केली थातुरमातुर ; अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत तपासणीसाठी जाणार न्यायालयात- घुमरे 




राज्य गुणवत्ता निरीक्षकांनी रस्त्याच्या कामाची तपासणी केली थातुरमातुर ; अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत तपासणीसाठी जाणार न्यायालयात- घुमरे

 बीड । तालुक्यातील उमरद, नागापूर ,ब्रह्मपुर ,आंबेसावळी, मन्यारवाडी या मार्गाचे काम बोगस झाले असून . शुक्रवारी राज्य गुणवत्ता निरीक्षकांनी या कामाच्या तपासणीचा केवळ फार्स केला आहे .आम्ही सुरुवातीपासूनच आमचा या समितीवर विश्वास नाही, असे सांगत आहोत. म्हणूनच या कामाची अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे यांच्यामार्फत तपासणी व्हावी. यासाठी प्रसंगी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य गंगाधर घुमरे यांनी म्हटले आहे.
 बीड तालुक्यातील उंबरद, ब्रह्मपुर, व आंबेसावळी ,ढेकनमोहा. या रस्त्याच्या कामाबाबत राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा परिषद सदस्य गंगाधर घुमरे यांनी तक्रारी केल्या होत्या . यावर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाची अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे . या त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्याचे आदेश दिले होते, मात्र ग्रामीण रस्ते विकास विभागाने तपासणीसाठी राज्य गुणवत्ता निरीक्षकांना पाठवले. या समितीने तपासणीचा केवळ फार्स केला असल्याचे गंगाधर घुमरे यांनी म्हंटले आहे .
सदर रस्त्याची तपासणी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे या त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी होणे आवश्यक आहे. त्या शिवाय वास्तव समोर येणार नाही. म्हणूनच त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणीसाठी आपण न्यायालयात जाणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादीचे नेते गंगाधर घुमरे यांनी  प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा