बीडशहराचे भूषण गल्ली बोळातील रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप




तासा भराच्या पावसाने बीड शहराची केली गटार गंगा ।

कुठे आहे स्वच्छ शहर सुंदर बीड शहर – सविता जैन

बीड । दि.१२ पावसाळा सुरू झाला आणि बीड शहरात भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या नगरपरिषदेच्या विकास कामाचे बिंग फुटु लागले, गल्लीबोळातील रस्त्यांना ओड्याचे व नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे, दर दिवस कुठे ना कुठेतरी रोड नाली कामाचा शुभारंभ करणाऱ्या नगराध्यक्ष साहेबांना, गल्लीबोळातील नाल्या ड्रेनेज साफसफाई स्वच्छता मोहीम करण्याची गरज भासलेली दिसत नाही, अंडरग्राउंड ड्रेनेज व पाण्याच्या पाइपलाइन सर्वच रोडची दुरावस्था खड्ड्या मध्ये साचले आहे पाणी, चिखलमय रस्ते, यावर्षीच्या पहिल्याच पावसात बीड शहरातील स्वच्छ शहर सुंदर शहर चे तीन तेरा वाजले आहेत, आहे सविता जैन यांनी सांगीतले, जुन्या गाव भागांमध्ये गल्लीबोळातील रस्त्यांना ओढ्या नाल्याचे स्वरूप आले आहे, प्रचंड प्रमाणात घाण, दुर्गंधी पसरली आहे, बीडच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या बीडच्या नगराध्यक्षांनी त्याकडे तात्काळ लक्ष घालून ही तुंबलेली शहराच्या मध्यभागातून जाणारी मोठे नाले साफ व स्वच्छता अभियान करणे गरजेचे आहे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा