सरकारने गांभीर्याने विचार करन्याची गरज – देवेंद्र फडणवीस




औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी पायी करण्याऐवजी मानाच्या दहा पालख्या त्या त्या गावांहून वाहनाने पंढरपूरला नेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. तर, पायी वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून वाखरी ते पंढरपूर पोलीस बंदोबस्तात पायी वारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणाले, कमी उपस्थितीत पायी वारी करणे शक्य होते. सरकारने थोडा गांभीर्याने विचार करायला हवा होता, असे फडणवीसांनी म्हटलेले आहे.
फडणवीस म्हणाले. मला असे वाटते की कमी उपस्थितीची पायी वारी करता येणे शक्य होते. थोडा सरकारने जर विचार केला असता. तर निश्चितपणे, कारण त्यांची जी मागणी होती की, केवळ ५० लोकांची आम्हाला परवानगी दिली जावी. यासोबत त्यांनी मार्गावरील सगळ्या गावांचे ठराव घेतले आहेत, की गावातून कुणीही रस्त्यावर येणार नाही. त्यामुळे इतके शिस्तीत जर जे काम होते. तर त्यांचा गंभीरतेने विचार सरकारने करायला हवा होता. असे देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा