डाॅ. ढवळे यांची कपिलधार वाडीत मन्मथस्वामीच्या पावनभुमित विनामूल्य आरोग्य सेवा !




बीड ।
ग्रामिण भागातील डोंगरपट्टयातील गावात, वाडीवस्तिवर दवाखाना व औषधीदुकान आदि. आरोग्य सुविधा नसलेल्या भागात ग्रामसमृद्धी चळवळ अंतर्गत सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्यामार्फत गरजु लोखांनी अंगावर दुखणे काढु नये तसेच दवाखान्यात जाण्यासाठी गैरसमजातुन टाळाटाळ करणारे अथवा दवाखान्यात जाण्याची सोय नसलेल्या वयोवृद्ध ग्रामस्थांना गावात जाऊन विनामूल्य तपासणी व औषधोपचार देण्यात येत असून त्या अनुषंगानेच आज कपिलधार वाडीत आरोग्य सेवा देण्यात आली.

बीड तालुक्यातील मन्मथस्वामीच्या कपिलधार तीर्थक्षेत्र परीसरातील मांजरसुंभा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या कपिलधार वाडी गावात  दिनांक 13 जून रविवार रोजी मारोती मंदिराच्या पारावर कोरोनाविषयक जनजागृती तसेच तपासणी व विविध आजारांवर विनामूल्य औषधोपचार  डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा