कोपर्डी प्रकरणातील दोषींना तत्काळ फाशी द्या; अन्यथा रस्त्यावर उतरू – बजगुडे पाटील




बीड । कोपर्डी येथील कु. श्रद्धा सुद्रिक या आमच्या बहिणीच्या हत्याकांडाला जवळपास पाच वर्षे पूर्ण होत आहेत. तरी देखील आध्याप दोषींना शिक्षा झालेली नाही. न्यायालयाने या प्रकरणातील दोषीवर फाशीची शिक्षा सुनावली आसताना आध्यप मात्र कारवाई झालेली नाही. याप्रकरणातील दोषींना तत्काळ फाशी देण्यात यावी नसता मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल आसा इशारा शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील यांनी दिला. कोपर्डी प्रकरणानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या एकाच छत्राखाली महाराष्ट्रातील मराठा समाज लाखोंच्या संख्येने आण्यायाविरूद्ध एकवटला, मराठा क्रांती मोर्चाच्या नावाखाली महाराष्ट्रात ५८ मुक मोर्चे शांततेत निघाली परंतु मोर्चातील एकही मागणी पूर्णत्वास गेलेली दिसत नाही. जिच्या मृत्युनंतर लाखोंची मोर्चे महाराष्ट्रात निघाली मराठा समाज एकाच छत्राखाली एकत्रित आला परंतु आद्याप मात्र त्या आमच्या भगिनीला न्याय मिळाला नाही. श्रद्धाच्या हत्याकांडाला १३ जुलै २०२१ रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. तरी देखील दोषींना आद्यप फाशी झाली नाही. औरंगाबाद खंडपीठात याच प्रमाणे चालु आसलेल्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झालेली असताना एकास एक न्याय व कोपरडी प्रकरणात मात्र आद्यप काहीच नाही. आशा प्रकारे जर पुतण्या मावशीचे राजकारण या प्रकरणात होत आसेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. आज न्यायाच्या प्रतीक्षेत असलेली आमची भगिनी श्रद्धा सुद्रिक प्रकरणातील आरोपींना तत्काळ फाशी द्या नसता राज्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल आसा इशारा शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील यांनी दिला. आज त्यांनी कोपर्डी येथे सुद्रिक कुटुंबाची भेट घेवून श्रद्धाच्या समाधीस्थळी अभिवादन केले, यावेळी श्रद्धाचे वडील बबनराव सुद्रिक, आई यांच्यासह कर्जत भाजपचे तालुकध्यक्ष डॉ. गावडे, भारत जाधव उपस्थित होतो.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा