रहदारीचा शेतरस्ता मुरमाचा बांध घालून आडवला !




रहदारीचा शेतरस्ता मुरमाचा बांध घालून आडवला ।

पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल !

बीड ! तालुक्यातील मौजे जुजगव्हाण येथील जमीन गट नंबर 42 मधील शेतरस्ता मुरमाचा बांध घालून अडवण्याचा प्रकार जुजगव्हाण येथे झाला असून सदरील रस्ता अडवणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस अधिक्षक बीड यांच्याकडे तक्रार केली आहे. मंगल भरत सुरवसे यांची जुजगव्हाण येथे शेती असून गट नंबर 42 मध्ये एक हेक्टर 32 आर जमीन आहे सदर जमीन वहीती करण्यासाठी जाण्या-येण्याचा रस्ता हा गावठाण जमिनीच्या बाजूने जात असून हा रस्ता दीपक विक्रम सुरवसे व पप्पू विक्रम सुरवसे यांनी ग्रामसेवक व सरपंच यांच्याशी संगनमत करून सहन जागा नावे करून घेतली व शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले आहे. दिनांक 10 जुन रोजी आरोपी यांनी मंगल सुरवसे व भरत सुरवसे हे शेतामध्ये रस्त्याने ट्रॅक्टर घेऊन जात असताना दीपक विक्रम सुरवसे यांनी ट्रॅक्टर वर दगडफेक केली यावेळी भरत सुरवसे यांच्या पाठीत दगड लागल्यामुळे त्यांनी ट्रॅक्टर थांबवले त्याचवेळी दिपक सुरवसे आणि पप्पू सुरवसे यांनी म्हटले की आत्ताच्या आत्ता ट्रॅक्टरला काडी लावून फेकून देतो असे म्हणत भरत ज्ञानोबा सुरवसे यांना काठीने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली पुन्हा जर या रस्त्याने आलास तर जिवंत ठेवणार नाही अशी जीव मारण्याची धमकी दिली आहे, सदरील मारहाण झाल्यामुळे पिंपळनेर पोलिस ठाण्यात 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. पिंपळनेर पोलिसांनी आरोपीवर कारवाई न केल्यामुळे आरोपी आम्हाला छळ करून त्रास देत आहेत आरोपीकडून मंगल भरत सुरवसे व त्यांचे पती यांच्या कुटुंबाला धोका असून आम्हाला संरक्षण देण्यात यावे अशी मागणी पोलीस अधिक्षक यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा