लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे विकासाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी खा.डाॅ. प्रितमताई मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करा – सविता बडे




तेलगाव।
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे बीड जिल्ह्यसह मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करावा. अशी निञुड ग्रा.पं.सदस्या तथा लोकप्रिय बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या सचिव सौ.सविता सुर्यकांत बडे यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पञकात निञुड ग्राम सदस्या तथा लोकप्रिय बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या सचिव सौ सविता सुर्यकांत बडे यांनी म्हटले आहे की, बीड जिल्ह्यासह मराठवाड्याचा सर्वांगिण विकास करणे हे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे स्वप्न होते. माञ नियतीने त्यांना त्यांचे स्वप्न पुर्ण करण्यापुर्वीच आपल्यातुन नेले.त्यामुळे त्यांचे अधुरे स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्यांच्या कन्या तथा माजीमंञी पंकजाताई मुंडे व खा डाॅ प्रितमताई मुंडे या प्रयत्नशील असुन,दोन्ही मुंडे भगिनी साहेबांच्या आदर्शाने समाजसेवा करत आहेत. आगामी कांही दिवसात केंद्रातील पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मंञिमंडळाचा विस्तार होणार आहे. या मंञिमंडळ विस्तारात बीडच्या लोकप्रिय खा डाॅ प्रितमताई मुंडे यांचा केंद्रीय मंत्री म्हणुन समावेश करावा. प्रितमताई मुंडे उच्च विद्याविभुषित असुन, जनसेवेचा ध्यास घेतलेल्या नेत्या आहेत. त्यांच्या मंञिमंडळ समावेश केल्यास बीड जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल. त्या मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी माजीमंञी पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे प्रयत्न करून, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे स्वप्न पुर्ती करतील यात शंका नाही.
तरी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व भाजपा पक्षश्रेष्ठी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात खा.प्रितमताई मुंडे यांचा समावेश करून, त्यांना मंञीपद द्या. अशी मागणी ही सौ.सविता सुर्यकांत बडे यांनी केली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा