भाजपाचे 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन- राजेंद्र मस्के




भाजपाचे 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन- राजेंद्र मस्के

बीड l
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2014 मध्ये संयुक्तराष्ट्र संघासमोर प्रस्ताव सादर करून 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवसाला मान्यता मिळवली. संपूर्ण विश्वातील लोकांसाठी स्वास्थ्य आणि कल्याणकारी पूर्णतावादी दृष्टिकोन उपलब्ध करण्याच्या हेतूने संयुक राष्ट्रसंघाने वैश्विक स्वास्थ्य आणि विदेशनीती अंतर्गत हा प्रस्ताव स्वीकारला.
आज जगासह संपूर्ण देशात 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. आंतरराष्ट्रीयोग दिन निमित्ताने योगाभ्यासाचा आग्रह धरून योगाचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण जगासह देशभरातील नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे. योगाद्वारे एकात्मतेची भावना जागवणे आणि बदलत्या जीवनशैली मध्ये योगाचा अंतर्भाव करून नवीन चेतना निर्माण करणे. स्वास्थ्य आणि कल्याणाचा मंत्र लोकांना देण्यासाठी 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने 21 जून रोजी सकाळी ६ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय नेत्रधाम जवळ, एकता नगर बीड येथे बीड जिल्हा भारतीय जनता पार्टी व पतंजली योग समिती बीड यांच्या संयुक्त विद्यमाने योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे.पतंजली योग परिवार तथा युवा भारत महाराष्ट्र राज्य प्रभारी अॅड. श्रीराम लाखे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण शिबिर संपन्न होणार आहे.
या शिबिरा मध्ये अखिल भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सहकार्यवाह प्रा.चंद्रकांतजी मुळे सर सावरकर महाविद्यालयाचे प्राचार्य संजय शिरोडकर,उपप्राचार्य लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर,प्रा.राजेश ढेरे,नवनाथ शिराळे,प्रा. देविदास नागरगोजे ,जगदीश गुरखुदे, भगीरथ बियाणी,प्रा.पांगरकर, सलीम जहांगीर,अजय सवाई, हरीश खाडे,संग्राम बांगर,भूषण पवार,नरेश पवार,अनिल चांदणे,संध्या राजपूत,शीतल राजपूत यांची विशेष उपस्थिती असणार आहे. हे योग प्रशिक्षण शिबिर वर्च्युअल होणार असून जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी, अनेक सक्रिय कार्यकर्ते ऑनलाइन सहभागी होणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.
भारतीय संस्कृतीमधील ‘योग’ संकल्पनेची मांडणी श्रीमद्भगवद्गीता ग्रंथात केलेली आहेच. शिवाय भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. योगाद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते. आणि शरीरही सुदृढ राखता येते. पण आणि मनाला स्वस्त ठेवणाऱ्या योग साधनेला जगभरातून स्वीकारले गेले. भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने होत आहे.
अत्यंत कमी कालावधीत या उपक्रमाने चळवळीचे रूप धारण केले.
जगातील अनेक प्रगत देशांनी योग साधना स्वीकारली असून ती आता जगातील अनेक देशांमध्ये रुजू लागली आहे. प्रत्येक नागरिकांनी योग साधना स्वीकारून आपले आरोग्य निरामय व सशक्त ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहनही आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने राजेंद्र मस्के यांनी केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा