संजय राऊतांच्या वाटेला कधी शिवथाळी येईल हे समजणारही नाही – नारायण राणे




मुंबई: शिवसेना भवनासमोर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. या राड्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना थेट इशारा दिलेला आहे. ज्यांनी कधी कुणाच्या कानशिलात लगावली नाही, त्यांनी धमकीची भाषा करू नये, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. तसेच स्वत:ला सांभाळा. तुमच्या वाटेला कधी शिवथाळी येईल हे समजणारही नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.
नारायण राणे पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. परवा झालेल्या हल्ल्यातील हात आणि पाय विसरणार नाही. ज्यांनी महिलांवर अत्याचार केले. त्यांना सोडणार नाही. शिवथाळी कोण कुणाला देतये हे पाहूच, असे सांगतानाच प्रसादाची परतफेड कशी करायची एवढे आम्ही शिकलो आहे. शिवसेनेतच शिकलो आहे. परतफेड योग्यवेळी कशी करायची हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही दिलेली थाळी व्हेज होती, तर नॉनव्हेज थाळी कशी द्यायची हे
आम्हाला चांगले माहीत आहे. त्यामुळे सांभाळा. स्वत:ला सांभाळा नाही. तर विनाकारण तुमच्या वाटेला कधी शिवथाळी येईल हे तुम्हाला समजणारही नाही, असे राणे म्हणाले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा