बीडमध्ये नगराध्यक्षांच्या हस्ते सिमेंट रस्ते कामांचा शुभारंभ




बीड  l

बीड नगर पालिकेच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरू आहेत. अंतर्गत रस्ते, नाल्यांची कामे देखील सुरू असून शहरातील प्रभाग क्र.०८ मधील मसरत नगर भागातील देशमुख हॉस्पिटल,फटाले हॉस्पिटल समोरील अन्विता हॉटेल मागील बाजू ते एस.बी.आय बँक पर्यंत अंतर्गत रस्ते आणि नाली कामाचे उद्घाटन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न झाले. हे काम माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झाले असून याभागातील नागरिकांची खूप दिवसांची मागणी पूर्ण केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आभार मानले.
याप्रसंगी नगराध्यक्ष बोलतांना म्हणाले की,बीड शहरात विशेष रस्ता अनुदान अंतर्गत अनेक भागात सिमेंट रस्ते आणि नाल्यांची कामे सुरू आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याने नागरिकांची तसेच दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय टळणार आहे. या भागातील नागरिक चांगले वृत्तीला आणि विकासाच्या कामाला सतत मदत करतात. त्यामुळे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जे काम केले आहे किंवा करत आहोत त्याचे आभार मानण्याची गरज नसून विकास कामे करणे हे आमचे कर्तव्य असल्याचे नगराध्यक्ष यांनी सांगितले.मात्र विरोधकांकडून खालच्या पातळीवर जाऊन विकास कामे न करता चालू असलेली कामे अडवली जात होती. त्यामुळे विकासकामे होत नसल्याचे देखील नगराध्यक्षांनी सांगितले. तसेच अनेक वेळा झालेल्या कामांवर जाऊन सेल्फी काढण्याचे लाजिरवाणे प्रकार विरोधक करत असून त्यांच्या हातात सेल्फी काढण्यापलीकडे काहीच नाही.बीड शहरातील विकास कामांसाठी माजीमंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केल्याचे देखील सांगितले.
यावेळी नगराध्यक्षांनी रस्ते,नाल्यांची कामे दर्जेदार करण्यासंदर्भात योग्य त्या सूचना केल्या.रस्ते आणि नाल्यांची कामे मार्गी लावल्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.यावेळी नगरसेवक विष्णू वाघमारे,बाबुराव दुधाळ,सलाम सेठ, डॉ. टी. एल. देशमुख,डॉ. शरद फटाले डॉ. राजीव उन्हाळे, हीमायू कबीर,सय्यद जावेद, गुलजार शेठ यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा