बेडुकवाडीमध्ये डाॅ. ढवळे यांची विनामूल्य आरोग्य सेवा !




पाटोदा तालुक्यातील बेडुकवाडी गावात डाॅ.गणेश ढवळे यांची विनामूल्य आरोग्य सेवा !
पाटोदा l तालुक्यातील मौजे बेडुकवाडी या गावात आज दिनांक 19 जून शनिवार रोजी विनामूल्य आरोग्य सेवा देण्यात आली.
ग्रामीण भागातील दवाखाना व औषधीदुकान आदि.आरोग्य सुविधा नसलेल्या भागात ग्रामसमृद्धी चळवळ अंतर्गत सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्यामार्फत विनामूल्य तपासणी व औषधोपचार तसेच कोरोनाविषयक जनजागृती करण्यात आली. ग्रामिण भागात कोरोना विषयक गैरसमज दुर करून शंकाकुशंकाचे निरसण करत भिती दुर करून त्यांना कोरोनाविषयक जनजागृती करण्यात येते. लाॅकडाऊन मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या तसेच दवाखान्यात जाण्यास सुविधा नसलेल्या वयोवृद्ध ग्रामस्थांना गावात जाऊन तपासणी व औषधोपचार देण्यात येतात. आज पाटोदा तालुक्यातील मौजे बेडुकवाडी याठिकाणी मारोतीच्या मंदिरात आरोग्य सेवा देण्यात आली. यावेळी नारायण शिंदे, अनिकेत शिंदे, बारीकराव शिंदे, विष्णु शिंदे आदिंनी उपक्रमास सहकार्य केले.

बेडुकवाडी नाव पडण्याचं अजबं कारण – आबासाहेब शिंदे 
चिबड्या रानामुळे रात्री बेडुक ओरडतात म्हणुन या गावास बेडुकवाडी नाव पडले . 300 च्या आसपास लोकसंख्या असलेल्या गावात शिंदे आडनावाचे लोक असुन राजगुरू आडनावाचे फक्त 3 घरं आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा