पत्रकार विनोद शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त परसबाग मोहिमेची सुरुवात व वृक्ष लागवड




पत्रकार विनोद शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त परसबाग मोहिमेची सुरुवात व वृक्ष लागवड

बीड ।( ढेकनमोहा) पत्रकार विनोद शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड तालुक्यातील काठोडा येथे कृषी सखी शालन पांडुरंग शिंदे यांच्या घरासमोरील शेतामध्ये वैयक्तिक परसबाग करण्यात आली या मोहिमेची सुरुवात विनोद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वृक्ष लागवड ही करण्यात आली. गरिबातील गरीब कुटुंबांना दररोजच्या आहारामध्ये ताजा भाजीपाला मिळावा व आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी परसबाग मोहिमेची सुरुवात करण्यात आली यावेळी केंद्रीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे उपस्थित होती. यावेळी सीटीसी शालन राजगिरे ताई यांनी बचत गटातील महिलांच्या सहाय्याने परसबाग तयार केली. परसबाग मोहिमेची सुरुवात काठोडा या गावातून करण्यात आली. यावेळी श्री मुरहारी सावंत जिल्हा व्यवस्थापक, श्रीमती रश्मि गोसावी तालुका अभियान व्यवस्थापन, शैलेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली परसबाग तयार करण्यात आली. यावेळी बचत गटातील महिला उपस्थित होत्या.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा