बीड मध्ये राष्ट्रीय काँग्रेस नेते राहुल गांधींचा वाढदिवस ‘संकल्प दिन’ साजरा




 

बीड ।    राष्ट्रीय काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महारष्ट्र बीड जिल्ह्यात जिल्हा अध्यक्ष पापा मोदी यांच्या सूचनेवरून काँग्रेस च्या वतीने शहरातील मा‌.गांधीच्या पुतळा समोर सामान्य माणसाचे प्रश्न महागाई, बेरोजगारी, आथिर्क संकट, शेतकरी प्रश्न यावर संघर्ष करण्याचा ‘संकल्प दीन’ साजरा करण्यात आला.

कांग्रेस पक्षाचे नेते मा.राहुल गांधींजीच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शहारतील मा.गांधी पुतळा समोर जोरदार नारेबाजी करत पेट्रोल- डिझेल दरवाढ, जीवनावश्यक वस्तुंची महागाई, खाद्य तेलाचे चढते दर, या विरोधात घोषणा देण्यात आल्या व एक देश ,एक बाजार पेठ कायदा, करार व्यवसाय कायदा आणि अन्न सुरक्षा सुधारणा कायदा चे पोस्टर जाळून होळी करून शेतकरी आंदोलन करण्यात आले.यावेळी “वारे मोदी तेरा खेल,स्ती दारू मंहगा तेल” “हमारा संकल्प , देश को बचाना है ,मोदी को हरणा हैं.”असा असंख्य घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

या आंदोलनाला कांग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक इद्रीश हाश्मी, ओबीसीं विभागाचे जिल्हा अध्यक्ष वचिष्ट बडे, अनुसुचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष गोविंद साठे, जिल्हा उपाध्यक्ष अरूण आबा कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष नागेश मिटे पाटील, सेवादल युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रूषभ कोठारी, शहार उपाध्यक्ष अॅड.नितीन वाघमारे सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा