निरोगी जीवनशैलीसाठी योगा आवश्यक – श्रीराम लाखे




योगाचा सर्वदूर प्रसार व्हावा – राजेंद्र मस्के

बीड।  सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मनशांती आणि सुदृढ शरीर ठेवायचे असेल तर निरोगी जीवनशैली साठी योगा अभ्यास आवश्यक आहे असे प्रतिपादन  पतंजली युवा चे प्रांत प्रभारी श्रीराम लाखे यांनी केले तर निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी योगाचा प्रत्येक घरापर्यंत प्रचार होणे आवश्यक आहे असे मत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता पक्ष बीड जिल्हा पतंजली योग समिती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पतंजलि युवा चे प्रभारी एडवोकेट श्रीराम लाखे म्हणाले की दीर्घ आयुष्य जगायचे असेल तर दररोज एक तास स्वतःसाठी द्या, योग करा कुठलेही आजार तुमच्याजवळ येणार नाहीत. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन पोहोचवले. निरोगी आयुष्यासाठी योगा आवश्यक आहे. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सहकार्यवाह प्रा चंद्रकांत मुळे म्हणाले कि आपल्या पूर्वजांनी दिलेली अमूल्य देणगी म्हणजे योग आहे, नित्य योग करणाऱ्यांना आजार होत नाहीत. योग हा जीवनाचा भाग झाला पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संघटन मंत्री प्रा. देविदास नागरगोजे यांनी केले सूत्रसंचालन महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ छत्रपती पांगारकर यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ ओम प्रकाश झंवर यांनी मानले. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ लक्ष्मीकांत बाहेगव्हानकर, उपप्राचार्य डॉ राजेश ढेरे, यांची उपस्थिती होती उपस्थितांचे स्वागत  महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. संजय शिरोडकर यांनी केले. कोरोना नियमांचे पालन करून ऑनलाइन पद्धतीने गूगल मीटआणि फेसबुकच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले. ॲडव्होकेट श्रीराम लाखे यांनी योग डे प्रोटॉकल नुसार विविध आसने आणि प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

आज जगासह संपूर्ण देशात २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात  येत आहे. यानिमित्ताने लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे व लोकप्रिय खा.डॅ. प्रितम ताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली २१ जून रोजी सकाळी ६ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय बीड येथे भारतीय जनता पार्टी व पतंजली योग समिती  बीड यांच्या संयुक्त विद्यमाने  योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. पतंजली योग परिवार तथा युवा भारत महाराष्ट्र राज्य प्रभारी योग गुरु अॅड. श्रीराम लाखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के  यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रशिक्षण शिबिर संपन्न  झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.  यावेळी डॉ.प्रशांत तालखेडकर,श्री अनंत देशपांडे,प्रा. गोपाळ धांडे, डॉ.अशोक डोके,राहूल पांडव,प्रदिप देशमुख, सलीम जहांगीर,अनिल चांदणे, संभाजी सुर्वे, संध्याताई राजपूत,शरद बडगे,शितल राजपूत, महेश सावंत,नरेश पवार, बद्रीनाथ जटाळ यांची  उपस्थिती होती.हे योग प्रशिक्षण शिबिर व्हर्च्युअल ही करण्यात आले. जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी,  कार्यकर्ते, योगसाधक नागरिकांनी ऑनलाइन सहभागी झाले होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा