आरोग्यदुत आंदोलकांच्या न्याय मागण्या मान्य करून गुन्हे रद्दबातल करून लाठीमार करणारांवर कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन – डाॅ.गणेश ढवळे




बीड । जिल्हा दौ-यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देण्यासाठी गाड्यांचा ताफा अडवणा-या आंदोलकांवरील लाठीमार प्रकरणात सरकारच्या धोरणाचा निषेध करत मागण्या मान्य कराव्यात तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊन लाठीमार करणा-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांना सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेख युनुस च-हाटकर भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड यांच्यासमवेत आक्रोश आंदोलन सुरू केले आहे.

दि.18 जुन 2021 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, बीड जिल्हा दौ-यावर कोव्हीड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकार्यालयात आले असता आढावा बैठकीनंतर निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळातील सदस्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणात व निवेदन देण्यासाठी उपमुख्यमंत्री यांच्या गाडीचा ताफा अडवुन निवेदन देण्याचा प्रयत्न करणा-या आंदोलकांवरील लाठीमार व गुन्हे दाखल करण्यात आले असून तात्काळ रद्द करण्यात यावेत या मागणीसह
कोरोना कालावधीत 3 महिन्यांसाठी आरोग्य भरती केलेल्या वाॅर्डबाॅय, परिचारीका, डाटा एंन्ट्री ऑपरेटर, हाॅस्पिटल मॅनेजर, डाॅक्टर, औषधीनिर्माण आधिकारी आदि पदांवरील कर्मचा-यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावुन घ्यावे.
कंत्राटी कर्मचा-यांना कायम स्वरूपी शासकीय सेवेत सामावुन घ्यावे. या मागण्याचे निवेदन देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळातील लोकांना अपमानास्पद वागणूक दिल्यानंतर निवेदन देण्यासाठी उपमुख्यमंत्री यांच्या गाडीचा ताफा अडवणा-या संभाजी सुर्वे, प्रतिक्षा हाडुळे, भागवत गायकवाड, हनुमान सानप, महेश काशिद,लहु खारगे, राहुल ससाणे, वैशाली सगळे, नंदा गोंडाळे, प्रीती सरवदे, रमा मालसमिंद, सीमा इनकर आदि. 200 आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत.
महिला आंदोलकांवरील लाठीमार प्रकरणात चौकशी करून दोषींवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
वरील मागण्यांसाठी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर. ,शेख युनुस च-हाटकर, बलभिम उबाळे यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा