बीडच्या शिवसृष्टीचे व क्रीडांगणाचे छत्रपती संभाजी राजेंनी केले कौतुक




 

बीडकरांच्या वतीने नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी केले स्वागत

बीड । खा.युवराज छञपती संभाजीराजे हे सध्या महाराष्ट्रभरात मराठा आरक्षण प्रश्नावर समाजबांधवांशी संवाद करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. दरम्यान यानिमित्ताने आज त्यांचे बीड शहरात आगमन झाले याप्रसंगी शहरवासियांच्या वतिने त्यांचे स्वागत नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी केले.तसेच छञपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात करण्यात आलेल्या शिवसृष्टीची त्यांनी पहाणी करुन छञपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभिकरण तसेच छञपती संभाजी महाराज क्रिडांगण नामकरण, छञपती राजर्षी शाहु महाराज यांचा पुतळा, व शिवसृष्टी,मराठा समाजासाठी मराठा भवन नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्याबाबत पालिकेने जागा उपलब्ध करुन दिली आहे तसेच बीड नगर परिषद ही महाराष्ट्रातील पहिली नगर परिषद आहे ज्यांनी मराठा आरक्षण साठी पालिकेत ठराव घेतलेला आहे,या सर्व कार्याबद्दल नगराध्यक्षांचे यावेळी छञपती संभाजीराजे यांनी कौतुक करत समाजबांधवांच्या वतीने अभिनंदन केले. मराठा भवन साठी खासदार फंड उपलब्ध करुन द्यावा याबाबतीत निवेदन यावेळी त्यांना देण्यात आले.यावेळी संपादक गंगाधर काळकुटे सभापती विनोद मुळूक,किशोर पिंगळे,ॲड.महेश धांडे,रवी शिंदे,सुभाष सपकाळ,वाघमारे,विठ्ठल गुजर,व आदि.उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा