निञुड गावचे तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय इमारती शोभेलाच




 

तेलगाव। माजलगाव तालुक्यातील निञुड येथील निवासी तलाठी इमारत व मंडळ अधिकारी कार्यालय इमारत गेल्या अनेक वर्षांपासून बांधण्यात आलेले आहे.माञ प्रत्यक्षात वापर होत नसल्याने तलाठी इमारत व मंडळ अधिकारी कार्यालय इमारत तशीच पडून आहेत.येथे निवासी म्हणजे जे तलाठी येथे आहेत त्यांना राहण्यासाठी व मंडळ अधिकारी कार्यालय यांची कार्यालय चालू कराण्यात यावी अशी मागणी भाजपाचे युवा नेते अर्जुन तातोडे यांनी एका प्रसिध्दी पञकाद्वारे केले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की माजलगाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या निञुड येथील तलाठी निवासी इमारत व मंडळ अधिकारी कार्यालयासाठी शासनाच्या वतीने गावातील बाजार तळावर लाखों रूपये खर्च करून तलाठी निवासी इमारत व मंडळ अधिकारी कार्यालयाची इमारती बांधण्यात आलेल्या आहेत.माञ या इमारत वापरा विना तशाच धुळाक्यात पडून आहेत.या इमारततीत व परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शासनाने या इमारतीसाठी लाखो रुपये खर्च केले मात्र येथे तलाठी यांना राहण्यासाठी इमारत व मंडळ अधिकारी कार्यालय इमारत सुरू न केल्याने लाखो रुपये पाण्यात जाण्याची शक्यता आहे. त्वरित तलाठी निवासी इमारत व मंडळ अधिकारी कार्यालय चालू कराव्यात अथवा निञुड येथील उपकेंद्राची इमारत ही मोडकळीस आलेली आहे यामुळे येथे आरोग्य सेवा मिळण्यासाठी उपकेंदाची इमारत ही व्यवस्थित नसल्याने येथे आरोग्य सेवा मिळत नाही त्यामुळे निञुड येथील तलाठी निवासी इमारत व मंडळ अधिकारी कार्यालय इमारत ह्या चालू करव्यात नसता शासनाच्या च आरोग्य खात्यास म्हणजे उपकेंद्रास वापरण्यास द्याव्यात अशी मागणी माजी ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांचे निकटवर्तीय व माजलगाव मतदारसंघाचे नेते रमेशराव आडसकर यांचे विश्वासू निञुड येथील युवानेते अर्जुन तातोडे यांनी एका प्रसिध्दी पञकाद्वारे मागणी केली आहे.

शासनाने चे लाखो रुपये पाण्यात!
शासनाने या इमारतीसाठी लाखो रुपये खर्च केले मात्र येथे तलाठी निवासी इमारत व मंडळ अधिकारी कार्यालय सुरू न केल्याने लाखो रुपये पाण्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे येथील इमारती शासनाच्याच आरोग्य खात्यास म्हणजे उपकेंद्रास वापरण्यास द्याव्यात.अशी मागणी अर्जुन तातोडे यांच्या सह परिसरातून होत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा