एकल महिला संघटना व आरसा फाऊंडेशनच्या वतीने चिंताग्रस्त मोर्चा




निराधार व महागाईच्या विरोधात नोंदवणार निषेध!

बीड । सोमवार दिनांक 05/07/2021 रोजी सकाळी :11:00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते कलेक्टर ऑफिस बीड. या मोर्चामध्ये निराधारांच्या विविध मागण्या व महिलांचे प्रश्न आणि महागाई विरोधात चिंताग्रस्त मोर्चाचे आयोजन केले आहे . यासंदर्भातील निवेदन पोलीस प्रशासनाला रुक्मिणी नागपुरे व ॲड सुजाता मोराळे यांंंनी दिले आहे. मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मंगल कानडे, कौशल्या कळसुले, अर्चना सानप मंगल मारगुडे कोमल मस्के, व बीड जिल्हा टीम यांनी केले आहे.

मागण्या :- 1) संजय गांधी, श्रावण बाळ योजना तील लाभार्थी ची होणारी पिळवणूक थांबवून लाभार्थ्यांनी केलेले अर्ज तात्काळ निकाली काढावे. व या योजनेचे नवीन अर्ज करण्यासाठी गावनिहाय कॅम्प घ्यावे.
2) दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र व 21 हजाराचे उत्पन्न ही अट नसावी व 40 हजाराचे उत्पन्न ग्राह्य धरावे.
3)निराधार पेन्शन मध्ये वाढ करावे.
4) ज्यांना रेशन कार्ड नाहीत त्यांना रेशनकार्ड देण्याची तात्काळ व्यवस्था करावी.
5) वाढलेले गॅस दर, व खाद्य तेलाचे भाव तात्काळ कमी करण्यात यावे.
6) खाजगी शाळांच्या फीस मध्ये 50% सूट द्यावी.
7) कोरोना महामारी च्या संकटात जर परत लॉकडाऊन लावण्यात आले तर सर्व सामान्य रोजगार वर काम करणाऱ्या महिलांच्या खात्यात 5 हजार रक्कम जमा करण्यात यावी.
8) बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व शहरातील घरेलू कामगार महिलांची शासकीय नोंदणी करण्यात यावी.
9) कोरोना परिस्थितीत महिलांना हाताला काम नाही. एकल महिलांना उद्योग व्यवसाय साठी 50 हजार कर्ज तात्काळ करावे.
10) निराधार महिलांना तात्काळ घरकुल देण्यात यावे. आशा प्रकारच्या मागण्या करण्यात येणार आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा