नवजीवनचे व्यसनमुक्ती कार्य प्रेरणादायी- मनिषाताई तोकले.




 

बीड । क्रांतिज्योत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पाटोदा संचलित नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकल्प संचालिका अंजली ताई पाटील व डॉ.राजकुमार गवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्रामध्ये पुणे नाशिक कोल्हापूर लातूर आंबेजोगाई बीड अशा विविध ठिकाणी नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे जे कार्य चालू आहे ते अत्यंत प्रेरणादायी आहे असे उद्गार बीडच्या सामाजिक कार्यकर्त्या मनीषाताई तोकले यांनी केले .नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या समुपदेशक वर्षा ताई शेरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळा मध्ये त्या बोलत होत्या .याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्य युवा पुरस्कार विजेते तत्वशिल कांबळे बेटी बचाव बेटी पढाव चे सामाजिक कार्यकर्ते अशोक भाऊ तांगडे व्यसनमुक्तीच्या सामाजिक कार्यकर्त्या ज्योती ताई कांबळे मनिषा ताई शिरसाट हे उपस्थित होते पुढे बोलताना मनिषा ताई म्हणाल्या व्यसनमुक्ती सारख्या संवेदनशील क्षेत्रामध्ये आज नवजीवन फार मोठे कार्य करत आहे मागील सात वर्षांमध्ये अनेक व्यसनी बांधवांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम वर्षाताई शेरकर व नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र करत आहे ही बाब खरंच कौतुकाची आहे .अशा संवेदनशील क्षेत्रामध्ये एक महिला काम करते ही खूप अभिमानाची गोष्ट आहे केवळ चूल आणि मूल ही संकल्पना बाजूला ठेवून प्रा.अंजली ताई पाटील, वर्षाताई शेरकर या काम करत आहेत महापुरुषांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे चालताना आज महाराष्ट्रामध्ये मुक्ताताई पुणतांबेकर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काम करत आहेत याच पद्धतीने काम आता मराठवाड्यात सुरू झाले आहे.पुढे आपणही आता व्यसनमुक्तीसाठी काम करणार असल्याचं त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकल्प समन्वयक अजिनाथ शेरकर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बीडचे सुप्रसिद्ध नाट्यकलावंत लक्ष्मीकांत दोडके व नवजीवन चे प्रमोद गायकवाड कृष्णा करमाळे अमोल जोमदे गणेश घंटेवाड यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमात रुग्ण मित्र अशोक गाडे ,परमेश्वर घोगरे. यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शेवटी प्रार्थना घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा